न्यूयॉर्क: कोणाचं नशीब कधी चमकेल हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकजण आयुष्यभर मेहनत करतात, तरी ते हवा तेवढा पैसा कमवू शकत नाहीत. तर काहींना अचानक जॅकपॉट लागतो. असंच काहीसं अमेरिकेती या व्यक्तीसोबत घडलं आहे. ज्याने अनवधानाने घेतलेल्या एका निर्णयाने त्याला करोडपती बनवलं. या व्यक्तीने अडीच कोटींची लॉटरी जिंकली आहे. त्याला ही लॉटरी कशी लागली याचा किस्सा त्याहून रंजक आहे.

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सुट्ट्या पैशांमुळे ही लॉटरी जिंकली आहे. ही व्यक्ती काही सामान घेण्यासाठी एका दुकानात गेला होता. तिथे दुकानदाराने त्याला १० डॉलर्स सुटे दिले. या पैशातून त्याने लॉटरीची काही तिकिटं विकत घेतली आणि निकाल आल्यावर त्याला सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
दक्षिण कॅरोलिना एज्युकेशन लॉटरी अधिकार्‍यांशी बोलताना त्या व्यक्तीने सांगितले की त्याने चार्ल्सटनमधील कमिंग स्ट्रीटवरील कॉलेज कॉर्नर स्टोअरमध्ये काही वस्तू खरेदी केल्या होत्या आणि दुकानदाराने त्याला १० डॉलर्स सुटे दिले. त्या व्यक्तीने सांगितले की, त्याने या पैशातून मल्टीप्लायर सर्ज स्क्रॅच ऑफ लॉटरीची काही तिकिटं खरेदी केली.

वडिलांच्या तीन अटी अन् पाठवणीवेळी लेकीचं लग्न मोडलं, पहिली अट वाचून डोक्याला हात माराल
तो म्हणाला की हा अचानक घेतलेला निर्णय होता आणि स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी तिकीट खरेदी करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून गेले.

डिझेल भरायला पैसे नव्हते, रुग्णवाहिका तब्बल एक तास पंपावर अडकली; गर्भवती महिलेला वेदना असह्य

त्याला ३ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे २.५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याने सांगितले की, ‘मी कामावर पोहोचलो आणि तपासले तेव्हा मला ३ लाख डॉलरची लॉटरी जिंकल्याचं कळालं. मी एवढी मोठी रक्कम जिंकली यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. एवढ्या मोठ्या रकमेचे काय करणार असे विचारले असता तो म्हणाला, ‘मला हे पैसे खर्च करण्याची घाई नाही. हे सर्व पैसे मी बँकेत ठेवेन आणि नंतर या पैशाचं काय करायचे ते ठरवेन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here