ठाणे : मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे; अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला इशारा दिला आहे. कल्याण लोकसभा कुणाची? या मुद्द्यावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद पेटल्याचं चित्र आहे.

मी ही स्टेटमेंट ऐकले, मीही पाहिलं सोशल मीडियावर, मलाही वाटतं की वरिष्ठ पातळीवर जो उमेदवार योग्य असेल, त्याला उमेदवारी मिळेल. मला एवढंच सांगावंसं वाटतं, की ही युती वेगळ्या विचारांनी झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विचारांनी युती केली आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. मात्र सिनीअर पीआयवर कारवाई होत नाही यासारख्या क्षुल्लक कारणावरुन हे ठराव करतात, की सेनेला सपोर्ट करायचा, कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू, यासारखी आव्हानं विचारपूर्वक केली पाहिजेत, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

आम्हाला आव्हानं देण्याची कामं करु नका, कारण शिंदेंनी दहा महिन्यापूर्वी जे केलं, त्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी हे पाऊल उचललं नसतं, तर त्याचे काय परिणाम झाले असते, याचा विचार केला पाहिजे, गेल्या नऊ वर्षात युतीमध्ये मी दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करतोय, उल्हासनगरमध्ये ५५ कोटींचा निधी भाजप नगरसेवकांना दिला, हे चांगलं काम सुरु असताना कोणीही युतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये. युतीसाठी काम करावं, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी काम करावं, कुठलाही स्वार्थ मनात ठेवू नये, असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलं.

Thane News: कल्याणमध्ये आम्ही सांगू तोच उमेदवार, भाजपने श्रीकांत शिंदेंविरोधात दंड थोपटले, राजकारण तापलं

मला कुठलाच स्वार्थ नाही, मला जर उद्या कोणी सांगितलं की कल्याण लोकसभेचा राजीनामा दे, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि पूर्णपणे पक्ष आणि युतीचं काम करायला तयार आहे. मला उद्या पक्षनेतृत्व किंवा तुम्ही सांगितलं, की तुम्हाला कल्याण लोकसभेसाठी चांगला उमेदवार मिळत आहे, तर तुमच्याप्रमाणेच मीही त्याला निवडून आणण्यासाठी काम करेन. आमचा उद्देश हाच आहे, की २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

राम शिंदेंच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटलांनी पहिल्यांदाच मौन सोडलं, तो विषय…

काय आहे प्रकरण?

आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले असून त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here