लखनऊ: मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. वरपक्ष गाजावाजा करत नव्या नवरीला घरी घेऊन आले. पण, लग्नाच्या पहिल्याच रात्री या नवरीला असं काही कळालं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीला कळालं की ज्याच्यासोबत तिचं लग्न झालं आहे तो तृतीयपंथी आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकचं नाही तर सासूने भासऱ्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोपही नवरीने केला आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून तपास सुरु आहे.

एखाद्या सिरिअलच्या कथेसारखी वाटणारी ही कहाणी एका तरुणीच्या आयुष्यात घडली आहे. हरदोई शहरात राहणाऱ्या या तरुणीने आपल्या सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. गेल्या १० फेब्रुवारीला तिचा विवाह शाहजहांपूर येथील एका तरुणाशी झाला होता.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
‘नवरा बहाणा करून खोलीबाहेर झोपला’

वधूपक्षाने लग्नात त्यांच्या ऐपतीनुसार भेटवस्तूही दिल्या होत्या. लग्न ठरण्यापूर्वी त्यांना सांगण्यात आले की, वर आणि त्याचा भाऊ दोघेही इंजिनिअर आहेत. लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सासरी पोहोचली तेव्हा मधुचंद्राच्या रात्री तिचा पती बहाणा करुन खोलीबाहेर झोपला. बरेच दिवस तो असं करत राहिला. याबाबत चौकशी केली असता तो तृतीयपंथी असल्याचं समोर आलं. ही गोष्ट लपवून त्याच्या आईने हे लग्न लावून दिले होते.

‘मी त्याला स्पर्श केला आणि तो म्हणाला…’

तरुणीने सांगितलं की, “मी १५ दिवस माझ्या सासरच्या घरी राहिले. नवरा तृतीयपंथी आहे हे कळल्यावर मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी त्याला स्पर्श केला तेव्हा तो म्हणाला की मी त्या लायक नाही”. त्यानंतर या संदर्भात तिने सासूकडे तक्रार केली. तेव्हा सासूने तिला भासऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप मुलीचा आहे. तसेच, या साऱ्या प्रकारानंतर सासू पती आणि भासरा आणि भावजयसोबत खोलीत निघून गेली.

योगींची दहशत, एन्काऊंटरने थरकाप, कुख्यात गुंड अतिक अहमदही थरथरायला लागलाय

या संपूर्ण प्रकरणामध्ये हरदोईचे एएसपी दुर्गेश कुमार सिंह यांनी सांगितले की, महिलेने पती, सासू, सासरा, भासरा, भावजय यांच्यावर छळ आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. यासंदर्भात एक अर्ज देण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. जे काही तथ्य समोर येईल त्या आधारे कारवाई केली जाईल.

वडिलांच्या तीन अटी अन् पाठवणीवेळी लेकीचं लग्न मोडलं, पहिली अट वाचून डोक्याला हात माराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here