सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात १६०० रुपयांची उलथापालथ दिसून आली. इंट्रा डेमध्ये सोने ५१८६५ रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरले. तर ५२५५० रुपयांचा स्तर गाठला होता. चांदीच्या दरात देखील ९८३ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या एक किलोला ६६९८० रुपये आहे.
रशियाने करोनाप्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन जोरात सुरु केले आहे. तर इतर देशांचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या निमित्ताने तेजीत आलेले सोने आणि चांदीच्या वाढीला ब्रेक लागला आहे. रशियात करोना लस तयार झाल्याने या महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारातदेखील सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ११६.९६ डॉलरने कमी झाला. जागतिक बाजारात सोने दर प्रती औंस ५.६७ टक्क्यांनी घसरून १९४४.४५ डॉलरवर बंद झाला होता. तर डिसेंबरचा सोन्याचा भाव ५.६८ टक्क्यांनी घसरून १९५३.७० डॉलर झाला होता. सध्या सोन्याचा भाव १९४० डॉलर प्रती औंस आहे.
goodreturs या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५१९९० रुपये आहे. तर २४ कॅरेट भाव ५२९९० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटसाठी सोने दर ५१८६० रुपये असून २४ कॅरेटसाठी तो ५६५७० रुपये आहे. कोलकात्यात सोन्याचा २२ कॅरेट साठी ५२५३० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५५२५० रुपये आहे. चेन्नईमध्ये सोने २२ कॅरेटसाठी ५१५७० रुपये असून २४ कॅरेट ५६२५० रुपये आहे.
गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान सोने आणि चांदीच्या भाव मोठी उसळी दिसून आली. या काळात सोने २३०२ रुपयांनी महाग झाले होते. तर चांदी तब्बल १०२४३ रुपयांनी वधारले होती. मात्र त्यानंतरच्या सत्रात नफेखोरांनी गुंतवणूक काढून घेतली. यामुळे या मौल्यवान धातूतील तेजीला ब्रेक लागला. १० ते १४ ऑगस्ट दरम्यान सोने २६४१ रुपये तर चांदी ५८४० रुपयांनी स्वस्त झाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.