विनोद वाघमारे, अमरावती : अमरावती जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आयशर गाडी क्र.एमपी ४८ एच ०४४२ आणि रिक्षा क्र. एमएच २७ एएफ १०६२ यांची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षातील तीन प्रवासी जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना अचलपुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदर घटना सिरजगाव कसबा-खरपी-परतवाडा मार्गावर घडली. घटनेची माहीती मिळताच सिरजगाव कसबा ठाणेदार प्रशांत गीते आपल्या सहकार्यासह घटनास्थळावर पोहोचले आणि अपघातातील जखमींना अचलपुर रुग्णालयात हलविले.

WTC Final चा तिसरा दिवस भारताचा, पाहा कोणत्या गोष्टींमुळे दिसली विजयाची आशा…
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, सिरजगाव-खरपी-परतवाडा मार्गावरील लालखा बाबा दरगाह जवळ आयशर आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबर होती की यात तीन जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये महिला आणि एक लहान मुलीचा तर एक पुरुषाचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. ज्यामध्ये एका महिलेची स्थिती चिंताजनक असून त्यांना जिल्हा रुग्णालय अमरावती येथे रेफर करण्यात आले. मृतांमध्ये शबाना परवीन सय्यद जमील (वय ४२) आणि माहेरा परवीन सय्यद मजहर (वय ९) वर्ष दोन्ही राहणार बऱ्हाणपूर मध्य प्रदेश आणि श्यामू धनराम धुर्वे यांचा समावेश आहे. घटना पाच वाजताच्या दरम्यानची आहे. ठाणेदार प्रशांत गीते घटनेची चौकशी करत आहेत.

ओ दादा मला वाचवाना; अखेरच्या श्वासापर्यंत तो विनवणी करत राहिला; पण… घराचा आधार, माऊलीचा अक्षय गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here