राज्यघटनेच्या अनुच्छेद १४५ (३) नुसार घटनेच्या व्याख्येशी संबंधित कायद्याच्या मूलभूत प्रश्नांशी संबंधित कोणत्याही खटल्याचा निर्णय घेण्यासाठी किमान पाच न्यायाधीशांचे पीठ असायला हवं. मात्र भूषण यांच्या प्रकरणात सुनावणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने घेतला, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.
संबंधित बातम्या :
वाचा :
वाचा :
वाचा :
‘तक्रारीची प्रतही अद्याप मिळालेली नाही’
आपल्याला ज्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय त्या प्रकरणाच्या तक्रारीची प्रतही आपल्याला अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून पुरवण्यात आलेली नाही, असं सांगत प्रशांत भूषण यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटबद्दल माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिलाय.
‘मला न्यायालयाकडून कोणत्याही दयेची अपेक्षा नाही. न्यायालयाकडून शिक्षा मिळण्याची भीती नाही. या गुन्ह्यासाठी मिळेल त्या शिक्षेसाठी आपण तयार’ असल्याचं प्रशांत भूषण यांनी म्हटलंय.
माझं ट्विट एक नागरिक म्हणून मी कर्तव्य पार पाडताना केलं होतं. यामुळे कुणाचीही अवमानना होत नाही. या ऐतिहासिक वळणावर मी बोललो नसतो तर मी माझ्या कर्तव्यात अयशस्वी ठरलो असतो. माझं माफी मागणंच अवमानना असेल, असं प्रशांत भूषण यांनी म्हटलंय.
काय आहे प्रकरण ?
प्रशांत भूषण यांनी न्यायपालिका आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध केलेल्या दोन ट्विटसमुळे त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे. ‘माजी १६ सरन्यायाधीशांमध्ये निम्म्याहून अधिक सरन्यायाधीश भ्रष्ट होते’ असं ट्विट प्रशांत भूषण यांनी २००९ मध्ये केलं होतं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण दोषी आढळल्याचं म्हटलंय. यावर प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार असल्याचं न्यायालयासमोर म्हटलंय.
इतर बातम्या :
वाचा :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.