मयुरेश प्रभुणे, पुणे : प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती तयार झाल्याचे अमेरिकेतील ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने (सीपीसी) गुरुवारी जाहीर केले. सध्या ‘एल निनो’ कमी तीव्रतेचा असला, तरी येत्या काही महिन्यांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यताही ‘सीपीसी’ने वर्तवली आहे. मान्सूनच्या आगमनादरम्यानच ‘एल निनो’ विकसित झाल्याने संपूर्ण मान्सून हंगामावर त्याचा प्रभाव राहणार का, अशी चिंता व्यक्त होत आहे.

या आधी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘एल निनो’ विकसित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या मान्सूनच्या उत्तरार्धात ‘एल निनो’चा प्रभाव राहील, असे हवामान तज्ज्ञांचे मत होते. मात्र, विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान कमी कालावधीत वाढून ‘ला निना’पासून ‘न्यूट्रल’ आणि आता ‘एल निनो’ची स्थिती तयार झाली आहे. यंदाच्या मार्चपासून प्रशांत महासागराचे तापमान वाढण्यास सुरुवात झाली. मे अखेरपासून प्रशांत महासागराच्या सर्वच भागांचे तापमान ०.५ अंशांच्या वर नोंदले जात आहे.

‘सीपीसी’ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ‘प्रशांत महासागरात सध्या क्षीण प्रकारचा ‘एल निनो’ अस्तित्वात आहे. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यापर्यंत ‘एल निनो’ सक्रिय राहण्याची शक्यता बहुतेक मॉडेल वर्तवित आहेत. येत्या नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत ‘एल निनो’ची तीव्रता सर्वाधिक राहण्याची शक्यता असून, तेव्हा ‘एल निनो’ची सर्वसाधारणपेक्षा अधिक तीव्रता राहण्याची शक्यता ८४ टक्के, तर तीव्र एल निनो राहण्याची शक्यता ५६ टक्के आहे.’
टोलनाक्यावर दिंडीतील वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर; काय आहे प्रकरण?

कमी पावसाची शक्यता

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एल निनो आणि मान्सून काळातील हंगामी पाऊस यांचा थेट परस्परसंबंध नसला तरी, ‘एल निनो’ सक्रिय असताना बहुतेक वर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. १९५१ ते २०२२ या कालावधीत सर्वसाधारण ते तीव्र स्वरूपाच्या एल निनोच्या एकूण १५ घटना घडल्या. त्यांपैकी आठ वर्षी मान्सून काळातील पाऊस सरासरीपेक्षा १० टक्क्यांहून कमी, तर तीन वर्षी सरासरीच्या पाच टक्क्यांहून कमी नोंदला गेला. सर्वसाधारण ते तीव्र स्वरूपाचा ‘एल निनो’ असताना ७३ टक्के वेळी हंगामी पावसाने सरासरी गाठली नाही.
ओ दादा मला वाचवाना; अखेरच्या श्वासापर्यंत तो विनवणी करत राहिला; पण… घराचा आधार, माऊलीचा अक्षय गेला

‘एल निनो’ची वर्षे आणि मान्सून हंगामातील पाऊस

‘एल निनो’ वर्ष———————– एकूण पाऊस

२००२——————————-सरासरीपेक्षा १९ टक्के कमी

२००४——————————-सरासरीपेक्षा १३ टक्के कमी

२००९——————————-सरासरीपेक्षा २३ टक्के कमी

२०१४——————————-सरासरीपेक्षा १२ टक्के कमी

२०१५——————————-सरासरीपेक्षा १४ टक्के कमी
WTC Final चा तिसरा दिवस भारताचा, पाहा कोणत्या गोष्टींमुळे दिसली विजयाची आशा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here