वृत्तसंस्था, भुवनेश्वर : बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातातील मृतदेह तात्पुरत्या स्वरूपात बहानगा हायस्कूलच्या इमारतीत ठेवण्यात आले होते. मात्र, यामुळे भीतीपोटी शाळेत जाण्यास मुलांनी नकार दिला होता. अखेर ६५ वर्षे जुनी असलेली ही इमारत पाडण्याचे काम ओडिशा सरकारने शुक्रवारी सुरू केले.

ही इमारत जुनी झाल्यामुळे सुरक्षित नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने (एसएमसी) सांगितले होते. शिवाय रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवण्यात आले होते, या कारणामुळे या शाळेतील विद्यार्थी वर्गांमध्ये जाण्यास तयार नव्हते. मुलांच्या मनात भीती असल्याने पालकांनीही इमारत पाडण्याची मागणी केली होती. शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय, पालक व स्थानिकांची मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी मुख्य सचिवांसह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला मंजुरी दिली. ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि डिजिटल वर्गखोल्या अशा आधुनिक सुविधांनी युक्त आदर्श शाळा बनवण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी मान्यता दिली. त्यानंतर शुक्रवारी ताबडतोब इमारत पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ‘एसएमसी’ सदस्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडकाम सुरू करण्यात आले.
Weather Update : महाराष्ट्रात तापमान वाढणार, उकाड्याची स्थिती कधीपर्यंत राहणार? पाहा हवामान विभागाचा अंदाजCostal Road : कोस्टल रोडच्या कामाबाबत अपडेट, मुंबई महापालिकेवर आर्थिक भार, ३५७ कोटी मोजावे लागणार, कारण…
दरम्यान, भीती आणि अंधश्रद्धा पसरवू नका, असे आवाहन बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी शुक्रवारी केले; तसेच तरुणांच्या मनात वैज्ञानिक वृत्ती रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सुचवले. तर, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी संबंधित अधिकारी समुपदेशन आयोजित करतील, असे शालेय आणि सामूहिक शिक्षण विभागाचे सचिव एस. अश्वथी यांनी सांगितले.

El Nino : भारतीयांची काळजी वाढवणारी बातमी, एलनिनोचं कमबॅक, मान्सूनवर परिणाम होणार का? चिंता वाढली

ओडिशा रेल्वे अपघातात २७८ जणांचा मृत्यू

ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार स्टेशन जवळ कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. या अपघातात २७८ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये काही जणांचा रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर काही काळासाठी मृतदेह बहानगा हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here