Mumbai Police Saves Man From Ending Life : सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओवर जीव देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी वाचवलं आहे. मुंबई पोलिसांनी लाइव्ह व्हिडिओ पाहून धाव घेतली. आणि तातडीने त्या तरुणाला शोधलं. भाईंदर पोलिसांनी ही कामगिरी केली.

मुंबई पोलिसांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती तत्काळ भाईंदर पोलिसांना दिली. भाईंदर पोलिसांनीही प्रसंगावधान दाखवून एक पथक तत्काळ खाडी पुलावर पाठवले. त्यांनी तरुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने सुरुवातीला संवाद साधण्यास नकार दिला. मात्र, नंतर पोलिसांनी त्याची समजूत काढल्यावर त्याचे मतपरिवर्तन झाले.
या तरुणाला घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी तो नैराश्यामुळे मागील चार दिवसांपासून जेवला नसल्याने त्याची प्रकृती खालावल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.