मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक यांनी आज दादर येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. ‘करोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारण करू नये. सर्वांना या संकटाशी एकजुटीनं लढायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत होते. इतर पक्षही त्यावेळी करोनाच्या संकटाशी लढण्यात व लॉकडाऊनमुळं अडचणी आलेल्या जनतेला धीर देण्याच्या कामात व्यग्र होते. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना त्यावेळी भ्रष्टाचार करण्यात गुंतली होती असं आमच्या निदर्शनास आलं आहे, असं देशपांडे यांनी सांगितलं. ‘महापौर पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीनं गैरमार्गानं काम मिळवल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. ‘दुसऱ्या तिसऱ्या कोणाला काम न देता परस्पर एखाद्याला बोलावून अॅग्रीमेंट केलं जातं यातच सर्व काही आलं,’ असं देशपांडे म्हणाले.
वाचा:
‘महापालिकेचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सभागृहही चालू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना केवळ मुंबई महापालिकेचेच सभागृह बंद का,’ असा प्रश्नही देशपांडे यांनी केला. ‘या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही देशपांडे यांनी केली. पुत्र मोहातून शिवसेना बाहेर पडेल का, असं ट्वीटही देशपांडे यांनी केलं आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thanks so much for the blog post.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.