म. टा. प्रतिनिधी, मुंबई : जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान पुलासंबंधी बांधकाम करण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने शनिवार मध्यरात्री बारा ते रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १४ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. हार्बर अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या वेळेत वांद्रे ते गोरेगाव अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. राम मंदिर स्थानकात लोकल उपलब्ध राहणार नाही. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून शेवटची गोरेगाव लोकल शनिवारी रात्री १०.५४ वाजता सुटेल. गोरेगावहून सीएसएमटीसाठी शेवटची लोकल ११.०६ वाजता रवाना होणार आहे. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून पहिली गोरेगाव लोकल दुपारी २.३३ आणि गोरेगाव ते सीएसएमटी लोकल दुपारी २.१८ वाजता रवाना होणार आहे.मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

Costal Road : कोस्टल रोडच्या कामाबाबत अपडेट, मुंबई महापालिकेवर आर्थिक भार, ३५७ कोटी मोजावे लागणार, कारण…
मध्य रेल्वे :

स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग – अप आणि डाऊन धीमा

वेळ – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम – ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.
Weather Update : महाराष्ट्रात तापमान वाढणार, उकाड्याची स्थिती कधीपर्यंत राहणार? पाहा हवामान विभागाचा अंदाज
हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल ते वाशी

मार्ग – अप आणि डाऊन

तान्हं बाळं रडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली; महापालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५

परिणाम – ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन लोकल रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी , ठाणे ते वाशी/नेरूळ आणि बेलापूर ते खारकोपर आणि नेरुळ ते खारकोपर दरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here