मुंबई : महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कधी दिलासा मिळतो याची सध्या सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत आहे. २२ मे २०२२ रोजी अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आला होता. तुम्ही पेट्रोल पंपावर गाडीची टाकी भरायला जात तेव्हा तुमची नजर फ्युएल डिस्पेंसर मशीनच्या मीटरवर असते. तुम्ही चुकूनही ‘शून्य’ पाहायला विसरत नाही आणि विसरलात तर पेट्रोल भरण्यापूर्वी पेट्रोल पंपाचे कर्मचारी तुम्हाला आठवण करून देतात. मीटरवर शून्य पाहून तुमचाही विश्वास बसेल की तुमच्या गाडीत योग्य पेट्रोल आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने तुमची फसवणूक केलेली नाही, याची खात्री पटते. तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल ज्यांना आत्तापर्यंत इंधन डिस्पेंसर मशीनवर शून्य पाहून आनंद होत असेल तर वेळेत सावध व्हा.

मीटरवर शून्य दिसल्यानंतरही पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक होऊ शकते. शून्य नव्हे, तर पेट्रोल पंपावर घनतेचा (डेन्सिटी) सारा खेळ खेळला जात आहे. शून्य न बघता पेट्रोल भरणारा तुमची फसवणूक करेल, गाडीच्या टाकीत थोडं कमी पेट्रोल टाकेल, पण घनतेत गडबड झाली तर तुम्हाला लाखोंचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पगार कमी असूनही तुम्हाला मिळेल कर्ज! ट्राय करा या ट्रिक्स, अर्ज मंजूर होण्याची वाढेल शक्यता
शून्यच नव्हे तर इथेही ठेवा नजर
पेट्रोल पंपावर तुम्ही जेव्हापण इंधन भरायला जाल तेव्हा फक्त मीटरवरील शून्य तपासू नका, तर पेट्रोल आणि डिझेलच्या घनतेची देखील काळजी घ्या. लक्षात घ्या की घनता थेट पेट्रोल किंवा डिझेलच्या शुद्धतेशी संबंधित सौं इंधनाच्या शुद्धतेसाठी सरकारने काही मानके निश्चित केली आहेत. मात्र, या मानकाशी छेडछाड केल्यास पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक होऊ शकते. खराब दर्जाच्या पेट्रोलमुळे तुमच्या वाहनाचे नुकसान होते.

घनता म्हणजे काय आणि कशी तपासायची?
डेन्सिटी म्हणजे पदार्थाची घनता. सोप्या भाषेत बोलायचे तर आपण पदार्थ किंवा उत्पादनाची डेन्सिटी त्याची घनता समजू शकता. म्हणजेच उत्पादन तयार करताना त्यात कोणता पदार्थ आणि किती मिसळायचे हे ठरविले जाते. जेव्हा एखादे उत्पादन विशिष्ट प्रमाणात घटकांचे मिश्रण करून तयार केले जाते, तेव्हा त्या आधारावर त्या उत्पादनाची गुणवत्ता ठरवली जाते. त्यात जर काही गडबड किंवा भेसळ असल्यास तुम्हाला योग्य उत्पादन मिळणार नाही.

जबरदस्तच! सरकारी योजनांमध्ये बँकेतील FD पेक्षाही जास्त परतावा, वाचा कशी करणार गुंतवणूक
पेट्रोलची घनता कशी तपासायची

पेट्रोलची घनता तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण ते तुम्हाला डिस्प्ले मशीनवर दिसेल. पेट्रोल आणि डिझेलच्या पावतीवरही ही माहिती मिळते. याशिवाय तुम्ही पेट्रोल पंपावर घनता जारने तपासू शकता. तसेच फिल्टर पेपरच्या मदतीने तुम्ही घनता तपासू शकता. फिल्टर पेपरवर पेट्रोलचे दोन थेंब टाका आणि पेट्रोल दोन मिनिटात उडून जाईल. सुकल्यानंतर कागदावर गडद रंगाचा डाग दिसला तर समजावे की पेट्रोलमध्ये भेसळ आहे.

पेट्रोलपंपावर 2000 ची नोट दिली; ग्राहकाच्या स्कूटीतून पेट्रोल पुन्हा काढून घेतलं

पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
मागील १३ महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्राने अखेरीस २२ मे २०२२ रोजी इंधनाच्या उत्पादन शुल्कात कपात केली, ज्याचे अनुसरण करत अनेक राज्य सरकारांनी देखील सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला होता. मात्र, तेव्हापासून राष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here