सोन्या-चांदीचा आजचा प्रति तोळा भाव
शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४४० रुपयांनी वाढून ६० हजार ८२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला, जो गेल्या ट्रेडिंग सत्रात ६०,३८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तसेच चांदीचा भाव १०५० रुपये वाढीसह ७४,३५० रुपये प्रति किलोवर स्थिरावला. दुसरीकडे, जागतिक बाजारात सोन्याचा भाव १,९६४ डॉलर प्रति औंस, तर चांदी २४.३५ डॉलर प्रति औंस वर व्यापार करत होती.
मिस्ड कॉलद्वारे सोने-चांदीची किंमत जाणून घ्या
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja कडून दर जारी केले जात नाहीत. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल द्या आणि थोड्याच वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला मौल्यवान धातूंचा ताजा भाव कळेल. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
लक्षात घ्या की इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती असते. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या असून ibja द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य असतात पण त्यांच्या किमतीत GST चा समावेश नसतो. त्यामुळे दागिने खरेदी करताना करांच्या जोडल्यावर तुम्हाला सोने किंवा चांदी जास्त किंमत देऊन खरेदी करावे लागते.