मुंबई : भारतीय शेअर बाजारात सध्या टाटा मोटर्सच्या शेअर्सची धूम आहे. टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर्सनी वर्ष-दर-वर्ष आधारावर ४२% वाढ नोंदवली असून शुक्रवारी शेअर ०.४६% उसळी घेत ५६२.२० रुपयांवर क्लोज झाला. विशेष म्हणजे गुरुवारच्या सत्रातील ५७६.५० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून स्टॉक २.४८% घसरला आहे. दरम्यान, शेअर बाजाराची उत्तम जाण असलेले तज्ज्ञ संदीप सभरवाल यांनी आगामी काळात ऑटो क्षेत्राची चांगली कामगिरी कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. असून सभरवाल यांना वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स पसंत आहे.

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये उसळी
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने मार्केट नियामक सेबीकडे आयपीओसाठी DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केल्यापासून टाटा मोटर्सचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. IT कंपनीने तीन महिन्यांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO साठी DRHP दाखल केले असून या तीन महिन्यांत टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत रु. ४३० प्रति शेअरवरून उ. ५६२ पर्यंत वाढली आहे. याशिवाय टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजीचा ट्रेंड चालू राहील कारण बाजाराला टाटा टेक्नॉलॉजीज IPO लाँच केल्यानंतर टाटा मोटर्सला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे, असा तज्ञांचा असा विश्वास आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत मार्केट डाऊन असूनही गेल्या काही सत्रात टाटा मोटर्सचे शेअर तुफान तेजीसह व्यवहार करत आहेत.

रॉकेटच्या वेगाने धावत आहे एनर्जी स्टॉक, देतोय बंपर परतावा, गुंतवणूकदारांची झाली चांदी
टाटा टेक्नोलॉजीजचा IPO
शेअर बाजारातील तज्ञांनुसार टाटा टेक्नॉलॉजीज IPO मध्ये टाटा मोटर्सचे शेअरहोल्डिंग असून ऑटो प्रमुख कंपनी या सार्वजनिक इश्यूमध्ये आपले शेअर्स विक्रीसाठी ऑफर करत आहे, जे १००% ऑफर फॉर सेल (OFS) आहे. म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज IPO च्या निव्वळ उत्पन्नामुळे टाटा टेक्नोलॉजीजऐवजी टाटा मोटर्सचा ताळेबंद मजबूत होईल. टाटा टेक्नॉलॉजीजने ९ मार्च २०२३ रोजी सेबीकडे DRHP दाखल केला.

Paytm Share Price: दमदार कमाई करण्यासाठी सोडू नका हा शेअर, पाहा ६ महिन्यात किती वाढला?
टाटा मोटर्स शेअरची वाटचाल
गेल्या पाच महिन्यात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना ५० टक्के परतवा दिला असून शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत तेजीने धावत आहेत. गेल्या एक महिन्यात स्टॉक ९% वाढले आहेत. अशा स्थितीत या शेअर्समध्ये आता कोणत्या स्तरावर गुंतवणूक करायची, असा प्रश्न नव्या गुंतवणूकदारांच्या मनात आहे. तसेच, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग कोणत्या स्तरावर केली पाहिजे, हे ही जाणून घेण्यास सध्याचे शेअरधारक उत्सुक आहेत.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

टाटा मोटर्सच्या शेअर्सने गेल्या ५ दिवसांत ५% पेक्षा जास्त परतावा दिला असून शेअर्समध्ये सहा महिन्यांत सुमारे २८% आणि एका वर्षात २६% वाढ झाली आहे. मात्र, गेल्या ६ महिन्यांत मोठ्या तेजीत स्टॉक वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे टाटा मोटर्सचा स्टॉक आपल्या ६ वर्षाच्या सर्वोच्च स्तरावर आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५४४ रुपये होती, तर सध्या शेअर ५६२.१५ रुपयावर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here