Sanjay Raut : उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेशी कसलाही संबंध नसलेल्या श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी देऊन फाजील लाड करण्यात आला होता, अशा शब्दात संजय राऊत यांनी कल्याणच्या जागेवरील वादावर भाष्य केलं.
हायलाइट्स:
- संजय राऊतांचा हल्लाबोल
- शिंदेपुत्राचा लाड झाल्याची टीका
- सेना कुणी फोडली, संजय राऊतांनी नाव सांगितलं
महाराष्ट्रातून शिवसेना कमजोर करुन मुंबईचा ताबा घेण्यासाठी, मुंबईवरच मराठी माणसाचं वर्चस्व नष्ट करण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर हे अमित शाह यांचं राजकारण आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जायला लागले, महाराष्ट्राचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न आला. एकनाथ शिंदे यांच्यावर ईडीतर्फे दबाव टाकण्यात आला. हे आदित्य ठाकरेंनी वारंवार सांगितलंय. हे मला देखील माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले. आम्ही अनेकदा चर्चा केल्या, आमचं म्हणनं होतं आपण खंबीर राहिलं पाहिजे, पण हे लोक घाबरले, आता गर्जना करत आहेत त्या पोकळ गर्जना आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला भाजप त्यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. कारण भाजपला महाराष्ट्राचा प्रश्न उठवणारा पक्ष नको आहे, असं राऊत म्हणाले.
२०१४ साली त्यांनी युती तोडली, भाजपनं त्यावेळी युती तोडली होती. एकनाथ खडसे यांनी तशी घोषणा केली होती. शिंदे गट आणि आमचं काही नातं राहिलेलं नाही, असं राऊत म्हणाले. भाजपशी आमची २५ वर्ष युती होती. भाजपचे नेते, कार्यकर्ते शिवसेनेशी संघर्ष करायचे. शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न करायचे तरी देखील आम्ही नातं निभावलं. आता त्यांना भाजपशी नातं निभावू द्या कळेल त्यांना कसं असतं, असा टोलाही राऊत यांनी लगावले.
ठाकरेंकडून शिंदे पुत्राचा फाजील लाड
आनंद दिघे जिल्हाप्रमुख होते, त्यावेळी शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे असताना जागा खेचून आणली होती. त्यानंतर शिवसेना ती जागा जिंकली. कल्याणचं नाही तर सगळ्या जागांवर हिच स्थिती असेल, असं संजय राऊत म्हणाले. कल्याणची जागा भाजपकडे होती आता शिवसेनाचा कल्याण डोंबिवली गड असल्यानं घेतली, असं संजय राऊत म्हणाले. ती जागा सातत्यानं जिंकलो, शिवसेनेशी कसलाही संबंध नसताना, कसलंही पक्ष कार्य नसताना ती जागा श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली, त्यासाठी गोपाळ लांडगे यांना दिलेली उमेदवारी मागं घेण्यात आली. हे लाड केले होते उद्धव ठाकरेंनी तेव्हा, शिंदे पुत्राचे हे फाजील लाड होते. दोनदा जागा दिली दोनदा निवडून आणलं आता त्यांना त्यांचा संघर्ष करुद्या. प्रत्येक जागेसाठी भाजप यांना रडवल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.