मुंबई :रतन टाटा हे फक्त एक दिग्गज उद्योगपती नाही तर अनेकांसाठी प्रेरणादायी स्थान आहेत. टाटांनी टाटा समूहाचा व्यवसाय नव्या शिखरावर नेऊन पोहचवलाच पण समाजातही मोठं योगदान दिलं असून आजही देत आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. उद्योगपती आणि स्तंभलेखक सुहेल सेठ यांनीही काही वर्षांपूर्वी रतन टाटांच्या जीवनाशी संबंधित एक किस्सा शेअर केला.

टाटांचा ब्रिटनच्या प्रिंसकडून पुरस्कर नाकारला
६ फेब्रुवारी २०१८ रोजी ब्रिटनचा शाही राजवाडा, बकिंगहॅम पॅलेस येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ब्रिटनचे तत्कालीन प्रिन्स चार्ल्स यांच्या हातून भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या परोपकारी कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणार होते. पण रतन टाटा त्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाही आणि यामागे कारण त्यांचा कुत्रा होता, हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल.

Tata Group: टाटांची नेक्स्ट-जेन, कोण आहे माया टाटा? ५६००० कोटींची संपत्ती असलेल्या महिलेशी आहे खास नाते
स्तंभलेखक सुहेल सेठ यांनी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये या घटनेची आठवण काढत रतन टाटा यांच्या तत्वांचे कौतुक केले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात रतन टाटा का आले नाहीत, हे सुहेल यांनी सांगितले. “सर्व काही ठरले होते. ब्रिटिश एशियन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,” ते म्हणाले. सुहेलने सांगितले की, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते २ किंवा ३ फेब्रुवारीला लंडनला पोहोचले.

एक मराठी तरुण ढाब्यावर ट्रक ड्रायव्हरसोबत बसायचा, त्याच्याच नावाने पुढे टाटा सुमो तयार झाली

सुहेलने सांगितले की, जेव्हा ते विमान प्रवासानंतर लंडन विमानतळावर उतरले तेव्हा त्यांच्या फोनवर रतन टाटांकडून ११ मिस्डकॉल नोटिफिकेशन्स आल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सुहेलने सांगितले की इतके मिसकॉल पाहून ते थोडं आश्चर्यचकित झाले आणि विमानतळावर त्यांची बॅग उचलल्यानंतर लगेच त्यांनी टाटांना फोन केला. रतन टाटांशी झालेल्या संवादाची आठवण काढताना सुहेलने सांगितले की, “त्यांचा एक कुत्रा – टँगो आणि टिटो – खूप आजारी पडले होते. त्यांनी दोघांपैकी नेमके कोणाचे नाव घेतले ते मला आठवत नाही, पण टँगो आणि टिटोपैकी एक गंभीर आजारी होता.”


रतन टाटा सांत्वनाला गेले अन् डेड बॉडीशी बोलून परत आले, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा
टाटांनी पुरस्कार नाकारला
त्यांनी पुढे म्हटले की, “टाटा यांनी मला सांगितले की तो आजारी आहेत आणि मी त्याला सोडून तिथे येऊ शकत नाही.” हे ऐकून सुहेलला आश्चर्य वाटले आणि प्रिन्स चार्ल्सचे नाव सांगून टाटा समूहाच्या अध्यक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. रतन टाटा पुरस्कार घेण्यासाठी त्या कार्यक्रमाला आले नव्हते.

सुहेल सेठ यांनी रतन टाटा या कार्यक्रमात न येण्यामागचे कारण ऐकल्यावर तत्कालीन प्रिन्स चार्ल्सने काय सांगितले याबद्दल सांगितले. प्रिन्स चार्ल्स यांना म्हणाले, “माणूस असाच असावा. रतन टाटा एक अद्भुत व्यक्ती आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here