भुवनेश्वर: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन ट्रेन्सचा भीषण अपघात झाला. २ जूनला झालेल्या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला असून हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले. अपघात होऊन सात दिवस उलटले आहेत. मात्र तरीही अनेक जण हा अपघात विसरलेले नाहीत. शेकडो जणांच्या आयुष्यावर या अपघातानं मोठा आघात केला आहे.बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ २ जूनच्या संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. कित्येक तास बचावकार्य सुरू होतं. या भागात अद्यापही अनेक मृतदेह असू शकतात, अशी शक्यता बहानगा रेल्वे स्थानक परिसरात राहणारे बोलून दाखवत होते. कारण या भागातून एक अजब वास येत आहे. रहिवाशांच्या तक्रारींनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
ट्रेन अपघातावेळी रेल्वे क्रॉसिंगवर १० ते १५ जण…; प्रत्यक्षदर्शी दुकानदाराचा खळबळजनक दावा
एनडीआरएफनं दोनवेळा अपघातस्थळाचं निरीक्षण केलं. त्यानंतर त्यांच्याकडून क्लिअरन्स देण्यात आलं. यानंतर स्थानिकांच्या तक्रारी मिळू लागल्या. त्यामुळे राज्य सरकारच्या पथकानं पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनास्थळावर येणारा वास अंड्यांमुळे येत होता, अशी माहिती आग्नेय रेल्वेचे सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांनी दिली.

यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसमध्ये जवळपास ४ टन अंडी होती. अपघातानंतर ही सगळी अंडी रेल्वे रुळांवर आणि त्याशेजारी फुटली. अपघाताला सात दिवस उलटले आहेत. त्यामुळे ही अंडी कुजली. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. ही अंडी हटवण्यासाठी बालासोर नगरपालिकेची मदत घेतली जात आहे, असं चौधरी यांनी सांगितलं.
माझं सौभाग्य गेलं! मृतदेहाजवळ बसून महिला ओक्साबोक्शी रडली; पोलिसाला संशय, फोन फिरवला अन्…
याआधी बहानगा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करण्यास नकार दिला. अपघातानंतर याच शाळेत मृतदेह ठेवण्यात आले होते. शाळेत मृतदेहांचा खच पडला होता. त्यामुळे बहानगा हाय स्कूलचा वापर काही दिवसांसाठी शवागार म्हणून करण्यात आला. सुरुवातीला मृतदेह शोधण्यासाठी शाळेतील ३ खोल्यांचा वापर करण्यात आला. मात्र मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी शाळेच्या मुख्य सभागृहाचादेखील वापर करण्यात आला.

9 COMMENTS

  1. Aw, this was a really nice post. In idea I would like to put in writing like this additionally ?taking time and precise effort to make a very good article?but what can I say?I procrastinate alot and under no circumstances seem to get something done.

  2. I as well as my buddies came following the best recommendations located on your website and then suddenly I got an awful feeling I never expressed respect to you for them. Most of the people ended up as a result happy to learn them and have now really been loving these things. We appreciate you truly being simply accommodating and for selecting some fine themes millions of individuals are really needing to be aware of. My personal sincere apologies for not saying thanks to you sooner.

  3. Aw, this was a very nice post. In concept I would like to put in writing like this additionally ?taking time and actual effort to make a very good article?but what can I say?I procrastinate alot and not at all appear to get one thing done.

  4. The following time I read a weblog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I imply, I do know it was my option to read, however I really thought youd have one thing fascinating to say. All I hear is a bunch of whining about one thing that you would fix in case you werent too busy looking for attention.

  5. Spot on with this write-up, I truly suppose this website needs much more consideration. I抣l in all probability be once more to read rather more, thanks for that info.

  6. Youre so cool! I dont suppose Ive learn something like this before. So good to seek out anyone with some authentic ideas on this subject. realy thank you for starting this up. this website is something that is needed on the internet, someone with a bit originality. useful job for bringing one thing new to the web!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here