Supriya Sule working president in NCP :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवली. याआधी त्यांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनीच राजीनामा देत दे धक्का दिला होता. सगळ्यांच्या दबावानंतर त्यांनी पुन्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी संघनेत बदल करत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यांची जबाबदारी दिलीय. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय. सुनील तटकरे हे राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या जबाबदारीसह ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी समस्या, अल्पसंख्याकांचे प्रश्न ही जबाबदारी देण्यात आलीय. राज्यातून जितेंद्र आव्हाडांकडेही बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, ओबीसी, एससी एसटी ही जबाबदारी देण्यात आलीय. शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी

पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार – सुप्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी पहिली प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय शरद पवार, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.

 राष्ट्रवादीने आज दोन कार्याध्यक्ष केले. संघटनात्मकदृष्ट्या मोठा बदल केला असून सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पक्षात प्रफुल्ल पटेल यांना बढती देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर झालेल्या या मोठ्या बदलांमुळे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आता पॉवर गेममधून बाहेर पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांचे वारसदार होण्यात अजित पवार मागे पडले असून, सुप्रिया सुळे यात त्यांच्या पुढे गेल्या आहेत.

सुप्रिया यांच्यावर तीन राज्यांची जबाबदारी 

 राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांच्याकडे तीन राज्यांची जबाबदारी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबच्या नावांचा समावेश आहे. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसला ताब्यात घेण्याचे स्वप्न भंगताना दिसत आहे.

 अजित यांनी केले शरद पवारांचे कौतुक 

पक्षप्रमुख शरद पवार यांचे कौतुक करताना अजित पवार यांनी म्हटलेय, आपल्या सर्वांचे नेते आणि प्रेरणास्थान असलेल्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी प्रगती सुरु आहे.  ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. पक्षाच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे अजित पवार म्हणाले. Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here