१ मे रोजी एक विमान कोलंबियाच्या अॅमेझॉन जंगलात कोसळल्याने महिला आणि दोन पायलट यांचा मृत्यू झाला होता. यात ४ मुले बेपत्ता होती. मात्र आता गेल्या महिन्यात विमान अपघातात वाचलेली चार मुले पाच आठवड्यांच्या गहन शोध मोहिमेनंतर देशातील अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये जिवंत सापडली आहेत. कोलंबियाच्या जंगलात 40 दिवसांपूर्वी हरवलेली 4 मुले जिवंत दिसली, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेड्रो यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भावंडांची काळजी घेत असलेल्या लष्करी आणि स्थानिक समुदायातील अनेक सदस्यांचे छायाचित्र शेअर केले.
मृत्यूनंतर काय होतं? पुन्हा जिवंत झालेल्या महिलेनं सारं सांगितलं, दुसऱ्या जगातून मेसेज घेऊन परतलीपेट्रो यांनी पत्रकारांना सांगितले की, फोटोमध्ये दिसणारे भावंडे शोधकर्त्यांना सापडले तेव्हा ते एकटे होते. आता त्यांना वैद्यकीय उपचार मिळत आहेत. तरुण हे जगण्याचे उदाहरण आहेत. तसेच त्यांची गाथा इतिहासात कायम राहील असे भाकीत केले. लेस्ली जेकोबॉम्बेयर मुकुटुय (१३), सोलेनी जेकोबॉम्बेयर मुकुटुय (९), टीएन रॅनोक मुकुटुय (४), आणि अर्भक क्रिस्टिन रॅनोक मुकुटुय हे एकमेव प्राणघातक विमान अपघातातून वाचलेले होते. १ मे च्या पहाटे हा अपघात झाला होता. जेव्हा सेस्ना २०६ सिंगल-इंजिन प्रोपेलर विमान इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे क्रॅश झाले होते. यात सहा प्रवासी आणि पायलट होते.

५००० फुट उंचीवर स्पाइसजेटचा थरार; पायलटच्या केबिनमधून धूर, प्रवाशांचा श्वास कोंडला

या अपघातात मुलांची आई, मॅग्डालेना मुकुटुय व्हॅलेन्सिया, पायलट आणि एक स्वदेशी नेता मरण पावला आहे. क्रॅश झालेले विमान अपघाताच्या दोन आठवड्यांनंतर १६ मे रोजी कोलंबियाच्या रेनफॉरेस्टच्या दाट भागात सापडले होते. या भागातून मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र मुले कुठेच सापडली नाहीत. खोल पर्जन्यवनात मुले बेपत्ता झाल्यामुळे लष्कराच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू झाली. शुक्रवारी, सैन्याने थर्मल ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या मुलांसोबत सैनिक आणि स्वयंसेवकांचा एक गट दर्शविणारी छायाचित्रे ट्विट केली. एका सैनिकाने सर्वात लहान मुलाच्या ओठावर बाटली धरली होती. कोलंबियाच्या लष्करी कमांडने आपल्या ट्विटर खात्यावर लिहिले की, आमच्या प्रयत्नांच्या संघटनामुळे हे शक्य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here