mira road live in partner murder: लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना मीरारोडमध्ये घडली. या घटनेनं सगळेच हादरले आहेत.

 

manoj sane
ठाणे: मुंबईजवळच्या मीरारोडमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला आहे. ३६ वर्षीय सरस्वती वैद्यची हत्या केल्याप्रकरणी ५६ वर्षांच्या मनोज सानेला अटक करण्यात आली. सरस्वतीनं ३ जूनला विष पिऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी मला अटक होईल, अशी भीती होती. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सानेनं चौकशीदरम्यान पोलिसांना दिली आहे.सरस्वतीची हत्या करुन सानेनं तिच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले. तुकडे इतके लहान होते की पोलिसांना ते मोजता आले नाहीत. दुर्गंधी टाळण्यासाठी त्यानं तुकडे कूकरमध्ये शिजवले. त्यानंतर ते भाजून भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले, अशी माहिती सानेनं पोलिसांना दिली. सरस्वतीच्या मृतदेहाची पूर्णपणे विल्हेवाट लावल्यानंतर आत्महत्या करायची, असं ठरवलं होतं. मला याबद्दल कोणतीच खंत वाटत नाही, असं मनोज सानेनं पोलिसांना सांगितलं. मनोजनं केलेला दावा पोली पडताळून पाहत आहेत.
सानेच्या दारात गेलो होतो, छान सुगंध येत होता, पण…; मनोज, सरस्वतीचा शेजारी काय म्हणाला?
मनोज सानेच्या घरातून जप्त करण्यात आलेले मृतदेहाचे तुकडे जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानं आत्महत्येचा दावा केला आहे. मात्र आम्हाला त्याबद्दल शंका आहे, असं पोलिसांनी सांगितलं. साने सातत्यानं त्याचे जबाब बदलत आहे. त्यामुळे खरी माहिती शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे.
विचित्र वागणं, दार कायम बंद; लिव्ह इन पार्टनरचे तुकडे करणाऱ्या सानेबद्दल शेजारी काय म्हणाले?
सरस्वतीनं विष पिऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूसाठी आपल्याला जबाबदार धरण्यात येईल अशी भीती वाटत असल्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असं मनोजनं सुरुवातीला पोलिसांना सांगितलं. मात्र त्यानंतर त्यानं वेगळाच दावा केला. दोघांमध्ये वाद झाला. सरस्वतीचं अफेअर असल्याचा संशय होता. वाद विकोपाला गेल्यानं संतापाच्या भरात चाकूनं भोसकून तिला संपवलं आणि मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी इलेक्ट्रिक कटरचा वापर केला, अशीही माहिती सानेनं पोलिसांना दिली. त्यामुळे सानेच्या जबाबावर पोलिसांना संशय आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here