यामध्ये मार्गातील सलग हवामानाची निरीक्षणं आणि इत्यादी माहिती असणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळेल. इतकंच नाहीतर वारीची व्यवस्था योग्य करण्यासाठी प्रशासनालाही याचा फायदा होणार आहे. यामध्ये पालखी २०२३ आषाढीवारीसाठी IMD पुणे, संपूर्ण कालावधीसाठी रोज विशेष हवामान सेवा पुरवणार आहे. यात मार्गातील सलग हवामानाची निरिक्षणे, पुर्वानुमान व इ. माहीती असणार आहे.
दरम्यान, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा आज टाळ मृदुंगाच्या निनादत पार पडला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात असणारं आहे. त्यानंतर उद्या पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पालखी देहुतून बाहेर पडताना संत तुकाराम महाराज यांचे सेवक असलेले अनगडशहा बाबा यांच्या दर्ग्याजवळ पालखीची आरती होणार असून त्यानंतर पालखी पुढच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
या पालखी सोहळ्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, भाजपच्या आमदार उमा खापरे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा पार पडला. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी दाखल झाले आहेत. पावसाने देखील काही वेळ हजेरी लावली होती.