नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यांवर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. शरद पवार यांनी अजित पवार यांना बाजूला सारत आपली कन्या सुप्रिया सुळे यांना आपले वारसदार नेमल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. या प्रश्नांची उत्तर खुद्द शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहेत.

लोकाग्रहास्तव सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती- शरद पवार

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी लोकांची मागणी होती. लोकाग्रहास्तव खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्य़क्षपदी नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्रासह, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढावी म्हणून हा बदल करण्यात आल्याचे पवार म्हणाले. लोकांना परिवर्तन हवं आहे, असेही ते म्हणाले.

WTC Final Day-2: अरेरे! विराट आऊट होताच अनुष्का शर्माचा चेहराच उतरला, रिअ‍ॅक्शन व्हायरल
पक्षात एकाच वेळी दोन कार्याध्यक्ष का नेमले गेले, असा सवाल शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले की, ‘देशाचा मोठा विस्तार लक्षात घेऊन दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले गेले आहेत. तसेच ही निवड करताना कुठला निकष लावला गेला असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, अनेक लोकांची तशी मागणी होती म्हणूनच दोन कार्याध्यक्ष निवडले गेले.

कार्याध्यक्षपद किती काळासाठी असणार?

कार्यकारी अध्यक्षांचे पद किती काळासाठी असणार? पदाची कालमर्यादा निश्चित केली आहे का? या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटले की, यासाठी आधी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी पक्षाची बैठक बोलावून त्याबाबतचा बदल करण्यात येईल.

अभिमानास्पद! एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच, सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस, पाहा व्हिडिओ
अजित पवार नाराज आहेत का?

पक्षात दोन कार्याध्यक्षपदे निर्माण केली जात असताना त्यांवर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली गेली. मात्र यात पक्षाचे अनुभवी नेते अजित पवार यांना स्थान देण्यात आले नाही, त्यांना बाजूला सारल्याने ते नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र या चर्चेलाही शरद पवार यांनी पूर्णविराम दिला. अजित पवार नाराज नाहीत, असे स्पष्ट करत त्यांच्यावर राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले आहे.

धक्कादायक! प्रेयसीने कोर्टात केलं लग्न, नंतर हनिमूनला गेली आणि कापून टाकला पतीचा प्रायव्हेट पार्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here