कोल्हापूर:छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजन रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच. त्यामुळे औरंगजेबाचे उद्दात्तीकरण होऊच शकत नाही, असे स्पष्ट आणि परखड प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, असेही ते म्हणाले.

कोणी औरंग्याचं नाव घेत असले तर माफी नाही, अहमदनगरमधील प्रकारावरून फडणवीसांनी ठणकावलं

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी भवनामध्ये आमदार हसन मुश्रीफ बोलत होते. नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आमदार मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, सैनिक आणि नोकर-चाकरही होते. महाराजांच्या सैन्यदलात २२ प्रमुख मुस्लिम होते. यावरून सैन्यदलात मुस्लिम मावळे किती असतील, याचीही प्रचिती येते. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्यसाठीची आमची ही लढाई औरंगजेबाशीच होती. त्यामुळे, औरंगजेब आपला होऊच शकत नाही, असेही ते म्हणाले.

Kolhapur Riots : कोल्हापूर दंगल: सरकारचा एक निर्णय आणि जिल्ह्यात कोट्यवधीचा फटका, राड्यानंतर नेमकं काय झालं?
७५ वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता हीच आमची आई आहे. या मातृत्वाच्या भावनेतूनच हिंदुस्तानी मुस्लिम समाज या मातीत राहीला. सामाजिक विद्वेषातून दंगे-धोपे आणि दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच आहे. कोणत्याही बहकाव्यामध्ये येऊन या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने आपल्या लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडणार नाहीत, याचीही दक्षता घेतली पाहिजे.

यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Shahu Maharaj: जे घडलं तशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेऊ, सर्व समाजांसह सलोख्यानं राहू :शाहू महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here