जयपूर: राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात एक तरुण इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. महिलेनं त्याला भेटण्यासाठी घरी बोलावलं. यानंतर तरुण तिच्या सासरी गेला. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आलं. त्याला महिलेच्या सासरच्या मंडळींनी पकडलं. त्याला महिलेच्या समोर बसवलं आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूरमधील एका गावात राहणाऱ्या तरुणाचे जहाजपूरमधीलच दुसऱ्या गावातील विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवरुन मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. महिलेनं त्याला मेसेज केला. ‘घरी ये. आज मी एकटी आहे,’ असा मेसेज महिलेनं केला. त्यानंतर तरुण महिलेच्या सासरी तिच्या भेटीसाठी पोहोचला. सासरच्या मंडळींना याची चाहूल लागली. त्यांनी तरुणाला पडकलं आणि त्याचे हात, पाय बांधले. माझी अप्सरा हरवलीय ओ! पुजारी पोलीस स्टेशनात; पोलिसांनी चक्रं फिरवली, धक्कादायक माहिती उघडकीस तू कोणाच्या सांगण्यावरुन इकडे आलास? तुला इथला पत्ता कोणी दिला? असे प्रश्न तरुणाला विचारण्यात आले. त्याच्यावर प्रश्नांचा अक्षरश: भडिमार करण्यात आला. यावेळी विवाहित महिलेला समोर बसवण्यात आलं. तरुण खरं बोलतोय का याबद्दल तिला विचारण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘या महिलेला मी माझ्यासोबत ठेवेन. तिच्याशी विवाह करेन,’ असं तरुण बोलताना दिसत आहे. तरुण हात जोडून गयावया करत आहे. त्याच्या कुटुंबियांशी त्याचा संवाद करुन देण्यात आला आहे.
यानंतर तरुण आणि त्याच्या विवाहित प्रेयसीला त्याच्या गावी नेण्यात आलं. तिथे पंचायत बोलावण्यात आली. तिथे त्यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. तरुणानं विवाहित प्रेयसीच्या कुटुंबियांविरोधात कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.