सांगली : घोडागाडी शर्यतीतल्या वादाचा राग मनात धरून सांगलीतल्या एका दाबेली चालक तरुणाचा निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शुभम माने याचा कुपवाड इथल्या यशवंतनगर चौकात धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिन जणांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

कुपवाड शहरातल्या यशवंतनगर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शुभम माने या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होता. शुभम माने याचा यशवंतनगर बस स्टॉपजवळ दाबेलीचा हातगाडा होता. नेहमी प्रमाणे शुभम हा त्याच्या गाड्यावर थांबला होता. रात्री १० च्या सुमारास यश सौंदाडे, प्रतीक वगरे आणि एक अल्पवयीन साथीदार असे तिघे शुभमच्या हातगाड्यावर आले आणि या तिघांनीही शुभमच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाने २७० धावांवरच का डाव घोषित केला, जाणून घ्या सर्वात मोठं कारण…
यानंतर शुभम याच्यावर धारदार शस्त्रांनी छातीवर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर हल्ला चढवत ८ ते १० वार करून शुभम याला जागीच ठार केले. घटनेनंतर सर्व हल्लेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला आणि यानंतर हल्लेखोरांचा तपास सुरू केला होता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकला माधवनगर रस्त्यावरील बस स्टॉपजवळ संशयित हल्लेखोर थांबल्याची माहिती मिळाल्यावर पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या यश सौंदाडे आणि प्रतीक वगरे आणि एक अल्पवयीन अशा तिघांना ताब्यात घेतंल. त्यांची चौकशी केली असता या तिघांनी शुभमसोबत कर्नाटक राज्याच्या चिंचणी येथे यात्रेवेळी आयोजित घोडा गाडी शर्यती दरम्यान वाद झाला होता.

या वादाच्या रागातूनच शुभम माने याची हत्या करण्यात आल्याची कबुली तिघांनी दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. या हत्या प्रकरणी यश सौंदाडे आणि प्रतीक वगरे या दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना पुढील तपासासाठी कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २७० धावांवर घोषित करत केला भारताचा मोठा गेम, पाहा काय आहे प्लॅन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here