नागपूर : नागपूर ग्रामीण अंतर्गत खापरखेडा पोलिसांनी गुरुवारी रात्री मनोरंजनाच्या नावाखाली जुगार अड्डे चालवणाऱ्या सात ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १८ लाख रुपयांचे मौल्यवान साहित्य जप्त केले असून २६ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जुगार चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. नागपूर ग्रामीणच्या खापरखेडा येथे गेल्या काही दिवसांपासून व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार अड्डे सुरु होते.
बाजारात जायला निघालेल्या महिलेला वाटेतच प्रसूती कळा, बिघडली प्रकृती अन्…

रात्रंदिवस येथे जुगार खेळणाऱ्यांची गर्दी होत होती. मजुरांसोबतच अनेक महाविद्यालयीन तरुणही या जुगाराच्या आहारी गेले होते. त्यामुळे जुगार चालवणारे दररोज लाखोंची कमाई करत होते. हा जुगार अड्डा बिनधास्त सुरू असल्याची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी सात वेगवेगळी पथके तयार करून गुरुवारी सात जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ८८ जुगार मशिन जप्त केल्या आहेत. मशीनची किंमत १७ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. यासोबतच पोलिसांनी तेथून १८ हजार ८०० रुपये रोख आणि ७,२०० रुपयांची साहित्य जप्त केला आहे.

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, ‘भानुदास एकनाथ’ अशा जयघोषाने पैठणनगरी दुमदुमली!

जुगाराचे अड्डे चालवणाऱ्या आणि खेळणाऱ्या एकूण २६ जणांना पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद व एसडीपीओ आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएचओ प्रवीण मुंडे, सहायक निरीक्षक दीपक कांकरेडवार, उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा आणि राजेश पिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे केवळ खापरखेडाच नव्हे तर नागपूर जिल्ह्यात अशा जुगाराचे अड्डे सुरू असल्याने सर्वच चालकांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळाले. सेफ झोनमध्ये जाण्यासाठी जुगारचालकांची दिवसभर धावपळ सुरू होती.
कुऱ्हाडीने डोक्यात वार, हाताचे बोट निकामी; ग्रामपंचायत सभेत महिला सरपंचावर जीवघेणा हल्ला
नागपूरच्या सदर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कॅफेच्या आड हुक्का पार्लर सुरू होते. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने तेथे छापा टाकून एका आरोपीला अटक केली. सदर माउंट रोडवरील बूटी कंपाऊंड येथे प्लेस कॅफे आहे. तेथे हुक्का दिला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. याच माहितीच्या आधारे छापा टाकला असता आरोपी निखिल खुशाल कुमरिया (३०) याच्याकडून हुक्क्याचा पॉट, फ्लेवर असा ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून त्याला सदर पोलीस ठाण्याचा पथकाने अटक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here