रत्नागिरी : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर धामणी येथे इको आणि नेक्सॉन कारच्या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना आज शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

गणपतीपुळेहून चिपळूणकडे जाणाऱ्या इको गाडी आणि पुणे भोर येथून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या नेक्सॉन कार यांच्यात अपघात झाला. अपघातामध्ये दोन्ही गाडीमधील १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये ईको गाडीमधील महिंद्र प्रकाश थोरवे, दीप्ती महेंद्र थोरवे, ऋतिका रमेश उपाध्ये, नेहा रमेश पांडे, नीत्यानंद फाटक, मोहित फाटक, सत्यजित थोरवे, सुमित फाटक तसेच नेक्सॉन गाडीमधील छाया संतोष शिनगरे, अविनाश ओंकार शिनगरे, नीता मंगेश शिनगरे आणि मंगेश अनंत शिनगारे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

भारतासाठी आली मोठी गुड न्यूज, ओव्हलच्या खेळपट्टीने कसा दिला ऑस्ट्रेलियाला धोका पाहा…
अपघाताची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक देशमुख घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सगळ्या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Gold Price Today : सोने २५०० रुपयांनी स्वस्त झाले, सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का?, तज्ज्ञ काय म्हणतात

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here