सोन्याचा भाव सध्या प्रति दहा ग्रॅम ६०,००० रुपये आहे. यूएस फेड रिझर्व्हची १३ जून रोजी बैठक होणार आहे. त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. चलनवाढ रोखण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने सलग १० वेळा व्याजदरात वाढ केली आहे. यावर आता ब्रेक लागू शकतो, असे मानले जात आहे.
या कारणास्तव, सध्या सोन्याच्या किमतीत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. असं असलं तरी उन्हाळ्याच्या हा काळ सोन्याच्या दृष्टीने कमकुवत मानला जातो. नजीकच्या काळात सोन्याच्या मागणीतही वाढ होईल असे कोणते कारण दिसत नाही. जागतिक शेअर बाजारात पुन्हा एकदा खरेदी दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी इक्विटीकडे वळत आहेत.
किंमत किती पर्यंत पोहोचू शकते?
यूएस फेड रिझर्व्हच्या बैठकीतून बरेच काही स्पष्ट केले जाऊ शकते. व्याजदर वाढीला ब्रेक लागला तर सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते. डॉलर निर्देशांक देखील १०४.५० ची पातळी टिकवून ठेवू शकत नाही आणि ही सोन्यासाठी चांगली बातमी आहे. देशांतर्गत बाजारात रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय हस्तक्षेप करू शकते. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होऊ शकतो. असे असले तरी सोन्याचा भाव वाढून तो ६३,६५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.