सातारा : वहागाव (ता. जावळी) येथील विश्वास कांबळे यांचा यांचा मुलगा अजिंक्य कांबळे याने एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले असून, तो सैन्य दलात अधिकारी झाला आहे. त्याच्या या कामगिरीने सातारा जिल्ह्यासह जावळी तालुक्याची मान देशात उंचावली आहे. सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करणे ही सातारा जिल्ह्याची परंपरा आहे. आजपर्यंत सातारा जिल्ह्यातील हजारो युवक सैन्य दलात सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. हीच परंपरा अजिंक्य कांबळे याने कमी वयात सैन्य दलात लेफ्टनंटपदी अधिकारी होऊन कायम ठेवली आहे.

सध्या मांजरी (पुणे) येथे आई-वडिलांसमवेत वास्तव्यास असलेल्या अजिंक्यने लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. अजिंक्यला त्याचे वडील विश्वास कांबळे आणि आई रेखा कांबळे यांनी पाठबळ दिले. आपला मुलगा सैन्य दलात मोठ्या पदावर अधिकारी व्हावा अशी त्यांची इच्छा होती, ती इच्छा अजिंक्यने खडतर कष्ट घेत पूर्ण केलीय.

कैदी तुरुंगातील झाडावर आंबे तोडण्यासाठी चढला, सहज खिडकीत लक्ष गेले, जे दिसले ते पाहून हादरला, प्रशासनात खळबळ
पुणे येथील सरदार दस्तूर हरमोसदियार हायस्कूल शाळेत अजिंक्यने दहावीत ९४ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएमध्ये प्रवेश घेण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्याने छत्रपती संभाजीनगर येथील सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमधून एनडीए ट्रेनिंगचे प्राथमिक प्रशिक्षण देणारे दोन वर्षांचे प्रशिक्षण शालेय शिक्षणासह पूर्ण केले. त्यानंतर सर्व सोपस्कार पार करून त्याने मोठ्या जिद्दीने पुणे खडकवासला येथील एनडीए अकादमीमध्ये प्रवेश मिळवला.

तेथील १४४ व्या तुकडीतून तीन वर्षांचे खडतर व आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच्या नुकत्याच दीक्षांत समारंभ झाला. या वेळी कोग्नीझंट टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ संचालक सचिन चव्हाण यांच्यासह सातारा, मुंबई व पुणे येथून नातेवाईक व मित्र उपस्थित होते.

Gold Price Today : सोने २५०० रुपयांनी स्वस्त झाले, सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का?, तज्ज्ञ काय म्हणतात
अजिंक्यचे वडील विश्वास हे पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांचे मूळ गाव दुर्गम जावळी तालुक्यातील वहागाव आहे. त्यांचे सर्व शिक्षण याच परिसरात झाले आहे. विश्वास कांबळे हे स्वतः कुडाळी प्रकल्पातील महू धरणात पूर्ण बाधित आहेत. एकीकडे त्यांनी देशाच्या विकासासाठी घर, जमिनीचा त्याग केला आहे, तर दुसरीकडे आपल्या मुलाला देशसेवेसाठी संस्कार देऊन मोठा अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

एनडीएमध्ये प्रशिक्षण घेऊन सैन्यात अधिकारी होणारा अजिंक्य हा दुर्गम जावळी तालुक्यातील युवक आहे. त्याच्या या निवडीमुळे जावळी तालुक्याची मान जिल्ह्यासह देशात अभिमानाने उंचावली आहे. त्याचा काल मायभूमी वहागाव येथे नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फटाके वाजवून, फुलाची उधळण करून त्याचे स्वागत करण्यात आले. त्याच्य निवडीने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

साक्षी मलिकचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाली, आशियाई क्रीडा स्पर्धेत तेव्हाच जाईन, जेव्हा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here