म. टा. प्रतिनिधी ।

गणेश चतुर्थीपूर्वी तीन दिवस आधीच येणाऱ्या सांगली संस्थानच्या चोर गणपतीचे बुधवारी पहाटे आगमन झाले. करोना संसर्गामुळे भाविकांच्या गैरहजेरीत पुजाऱ्यांनी चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली. रात्रीच्या अंधारातच आगमन होत असल्याने याला असे म्हटले जाते. दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या चोर गणपतीचे यंदा करोना संसर्गामुळे चोरपावलांनी आगमन झाले.

दरवर्षी सांगलीत संस्थानच्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असतो. परंपरेनुसार भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या चोर गणपतीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केल्यानंतर गणेशोत्सवाला सुरुवात होते. हा गणपती रात्रीच्या अंधारात येतो. रात्रीतच त्याची प्रतिष्ठापना होते. बहुतांश भाविकांना तो कधी आला याचा थांगपत्ताही लागत नाही. यामुळे त्याला चोर गणपती असे म्हटल्याची आख्यायिका सांगितली जाते. यंदा मात्र करोना संसर्गामुळे चोर पावलांनीच चोर गणपतीचे आगमन झाले.

वाचा:

मोजक्या पुजाऱ्यांनी पूजाअर्चा करून त्याची प्रतिष्ठापना केली. परंपरेनुसार साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या आहेत. तेव्हापासून या तशाच आहेत. दरवर्षी रंगरगोटीशिवाय त्यांना हात लावला जात नाही. दरबार हॉलमध्ये मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला या दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. ऋषीपंचमीच्या रात्री लळीत कीर्तनाने उत्सवाचा समारोप होतो. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवल्या जातात. दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन गणपती पंचायतन ट्रस्टने केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to เบอร์สวยมงคล Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here