नवी मुंबई: महाराष्ट्रात तील अनेक शहरामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे स्टेटस समाज माध्यमात ठेवल्याने शांतता भंग झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यात औरंगजेबाच्या फोटोच्या मुद्द्यावरून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी धार्मिक दंगली झालेल्या आहेत. आता तर नवी मुंबईमध्ये देखील धार्मिक तेढ निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई शहर हे धार्मिक दंगलीसाठी प्रसिद्ध नसून औरंगजेबाजाच्या मुद्दावरून नवी मुंबई मध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

मोबाईल सेवा देणाऱ्या एका दुकानात काम करणाऱ्या २९ ते ३० वर्षीय युवकाने औरंगजेबाचा फोटो असलेले स्टेटस ठेवलं होतं. हे लक्षात येताच त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद, शिव शंभो प्रतिष्ठान, तसेच हिंदू सकळ समाज संघटना तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संध्याकाळी सात वाजल्या पासून जमा होऊ लागले. त्यात या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
Shivsena BJP : कल्याणच्या वादाची सोलापूरमध्ये धग, माढ्यात हिशोब चुकता करणार? सेनेच्या नेत्याची खदखद, म्हणाला..
सुरुवातीला ही बाब लक्षात आल्या नंतर हिंदू संघटनांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेतला आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, असा दावा करण्यात आला आहे. या बाबत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की एका युवकाची चौकशी सुरु असून सध्या पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले आहे. चौकशी नंतर त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

औरंगजेबाचा फोटो स्टेटस ठेवून नवी मुंबईमधील धार्मिक गटांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून सार्वजनिक शांतता बिघडवणे संभवनीय आहे त्यामुळे मोहम्मद अली मोहम्मद हुसेन या २९ ते ३० वर्षीय व्यक्तीच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत
पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात, चार वाहने एकमेकांना धडकली, बस उलटली, चौघांचा मृत्यू
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सर्व समाजाच्या नागरिकांना शांतता बाळगवण्याचं आवाहन केलं आहे. नवी मुंबईतील परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
Cyclone Biparjoy : महाराष्ट्रावरील चक्रीवादळाचे सावट दूर? गुजरातला IMDचा यलो अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here