रवी राऊत, यवतमाळ : यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका पॅलेस शेजारी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अक्षय कैथवास असे मृताचे नाव आहे. तो कार शॉपमध्ये आला असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पैशांवरून ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून हत्येच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

अशातच प्रचंड वर्दळ असलेल्या पांढरकवडा मार्गावरील कार शॉपमध्ये अक्षयवर अज्ञातांच्या टोळीने हल्ला चढवत त्याच्यावर गोळीबार केला. यात तो जागीच कोसळून त्याचा मृत्यू झाला. काल शनिवारी रात्री उशिरापर्यंत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अक्षयचे नातेवाईक आक्रोश करत होते. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी नातेवाईकांनी मागणी केली आहे.
भारताला WTC Final मध्ये इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत एकाही देशाला ही गोष्ट जमली नाही…
पोलीस गुन्हा नोंदविण्यासोबतच आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती समजतात जिल्हा पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली असताना मृत तरुणाचा देह पंचनामा करून शवविच्छेदन गृहात रवाना करण्यात आला. ही हत्या कुठल्या कारणातून झाली याचा तपास पोलीस करीत आहेत.

Cyclone Biparjoy : महाराष्ट्रावरील चक्रीवादळाचे सावट दूर? गुजरातला IMDचा यलो अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here