नवी दिल्ली : अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानातील लाहोरपर्यंत जाऊन पोहोचले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई हद्दीत परत जाण्यापूर्वी हे विमान गुजरानवाला येथे पोहोचले. फ्लाइट रडारनुसार, ४५४ नॉट्सच्या वेगाने उड्डाण करणारे भारतीय विमान शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास लाहोरच्या उत्तरेमध्ये दाखल झाले आणि रात्री ८.०१ वाजता भारतात परतले. दरम्यान, विमान भरकटल्यानंतर अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याचे इंडिगोने सांगितले.

एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानामुळे विमान अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाले होते. यादरम्यान अमृतसर एटीसी सतत पाकिस्तानी एजन्सीशी दूरध्वनीवरून संपर्कात होते.

Fadnavis : राष्ट्रवादीने भाकरी फिरवली नाही, तर…; देवेंद्र फडणवीसांनी फोडले नव्या चर्चेला तोंड
इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, अमृतसरहून अहमदाबादला येणारे फ्लाइट क्रमांक 6E-645 खराब हवामानामुळे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले. या मार्गावरून विमान भरकटून ते अटारी सीमेवरून पाकिस्तानात घुसले. यादरम्यान पाकिस्तानच्या एजन्सी अमृतसर एटीसीशी दूरध्वनीद्वारे सतत संपर्कात होत्या. विमानातील कर्मचारीही पाकिस्तानी एजन्सींच्या सतत संपर्कात राहिले आणि भरकटल्यानंतर विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरवले गेले.

Virar : इमारतीच्या ४थ्या मजल्यावरून चिमुकली पडली, गॅलरीचे काम सुरू होते, बिल्डरवर गुन्हा दाखल
विमान वेळेपूर्वी आले

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सच्या माहितीनुसार, सकाळी ७.४५ वाजता अमृतसरहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचा रस्ता चुकला. विमानाने गुजरानवालापर्यंत उड्डाण केले आणि त्याने लाहोरभोवती एक विस्तृत वळण घेतले. त्यानंतर ते पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब शहराजवळ भारतीय हवाई हद्दीत आले. नोंदीनुसार, एवढा मोठा वळसा घालूनही विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेळेपूर्वी उतरले.

Success Story: खरा ‘स्लमडॉग मिलेनियर’! हातगाडीवर बिर्याणी विकणाऱ्या मुलाला लागली लाखोंची नोकरी
पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, तेथील नागरी उड्डयन प्राधिकरणाच्या (सीएए) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, असे होणे असामान्य नाही, कारण खराब हवामानाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा स्थितीला परवानगी दिली जाते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मे महिन्यात पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइनचे (पीआयए) विमान भारतीय हवाई हद्दीत घुसले आणि तेथे सुमारे १० मिनिटे थांबले होते.

हे विमान ४ मे रोजी मस्कतहून परतत होते आणि लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे बोईंग ७७७ विमानाच्या पायलटला तसे करणे कठीण होत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here