नवी दिल्लीः अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर सीबीआय एसआयटीची बैठक सीबीआय मुख्यालयात सुरू आहे. दरम्यान, आता सीबीआय डीआयजी सुवेझ हक यांची सीबीआय आणि मुंबई पोलिसांमधील नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयचे पथक आज संध्याकाळपर्यंत मुंबई दाखल होईल, असं सांगण्यात येतंय.

तपासणीचा एक भाग जवळजवळ पूर्ण झाला आहे. सीबीआयने बहुतेकांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये सुशांतच्या फायनान्सशी संबंधित स्टेटमेन्टचा समावेश आहे. याशिवाय सीबीआयने मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवरील आरोपांबाबतही जबाब नोंदवला आहे.

याशिवाय सीबीआय एसआयटीला मदत करण्यासाठी एक फॉरेन्सिक विज्ञान तज्ज्ञ आणि विश्लेषकांची एक टीम तयार केली गेली आहे. यासोबतच सीबीआयने या प्रकरणी मुंबई पोलिसांशी औपचारिक संपर्क साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआय सुशांत प्रकरणाची चौकशी करणार आहे. याशिवाय सीबीआयची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. यात सुशांतचा खटला कसा चालवायचा यावर चर्चा झाली आहे.

एसआयटी घोषणा

सीबीआयने सुशांत प्रकरणाच्या तपासासाठी आधीच तयारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची घोषणा करण्यात आली. एसआयटीचे अध्यक्ष सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर असतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अतिरिक्त एसपी अनिल यादव हे या संघात सहभागी होतील. हे सर्व सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी करतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here