अहमदनगर: सरकारने मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करण्यास किती खर्च केले, हे आम्हाला चांगले माहिती आहे. मंत्र्यांचे दालने दुरुस्त करण्यास किती खर्च केले, हेही माहिती आहे. तुम्ही मंत्र्याच्या गाड्या खरेदी करण्यास किती खर्च केले, हे देखील आम्हाला माहिती आहे. लॉकडाऊन असताना, राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना, हे सर्व तुम्हाला जमते. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्यावेळी त्याच्या मागण्याचा विचार करणार नसाल तर मग मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तुम्हाला रस्त्यावर तुडवून मारले तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका,’ असा इशारा शेतकरी नेते देतानाच, ‘तशी वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर येऊ देऊ नका,’ असा धमकीवजा सल्लाही सरकारला दिला.

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. आज दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. हा प्रश्न सर्वांचा आहे , याची जाणीव दूध उत्पादक शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे. सर्वजण रस्त्यावर उतरले तर मागण्या सरकारला पूर्ण करावीच लागतील. त्यासाठी आपण गावागावातील दूध उत्पादक एकत्र करून त्यांना एका झेंड्याखाली आणले तर त्याचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

वाचाः

‘परदेशातून दूध भुकटी आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करा, निर्यात करण्यासाठी सबसिडी द्या, दूधजन्य पदार्थावरील जीएसटी हटवा, अशा आपल्या मागण्या आहेत. पण हे सर्व केल्यानंतर देखील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. तोपर्यंत दिलासा म्हणून राज्य सरकारने तातडीने लिटरमागे पाच रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे. हा निर्णय जोपर्यंत सरकार घेणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. तसेच ते आगामी काळात तीव्र केले जाईल. आंदोलन तीव्र करण्याची आमची पोकळ धमकी नाही, हे लक्षात ठेवा. सरकारला गुडघे टेकण्यास लावण्याची ताकद दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

‘सरकार कोणाचेही असो, कुठल्याही आघाडीचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्याला गुडघे टेकायला लावण्याची ताकद दूध उत्पादक शेतकऱ्यांना आहे, व आम्ही यापूर्वी ते करून दाखवले आहे. पुन्हा ते करण्याची वेळ आणू नका. त्या आधीच आमच्या मागण्या पूर्ण करा, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने दूध अनुदानापोटी दीडशे कोटी रुपये खर्च करावेत. ते त्यांनी खर्च केल्यावर केंद्र सरकार कसे पुढे येत नाही, ते आम्ही पाहतो, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

वाचाः

‘आजचा मोर्चा हा केवळ इशारा देण्यासाठी आहे. आम्ही दूध पट्ट्यात असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार आहोत. सुरुवातीला आम्ही एक दिवसाचे लाक्षणिक बंद केला. त्यानंतर मुदत दिली. मुख्यमंत्री ते पंतप्रधान, राज्य कृषिमंत्री ते केंद्रीय कृषिमंत्री, अशा सर्वांना पत्रव्यवहार केला. आता ही मोर्चाची मालिका संपल्यानंतर मागण्या पूर्ण न झाल्यास सरकारला टप्प्याटप्प्याने कसे अडचणीत आणायचे, हे चांगले माहिती आहे. पुढील आंदोलन हे यापूर्वी झालेल्या आंदोलनात पेक्षा आक्रमक असेल, निर्णायक असेल व त्याची धग सरकारला सोसणार नाही,’ असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here