पुणेः शहरातील अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असताना बंद असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होता. ही सेवा सुरू करण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी दुपारी एका बैठकीचे आयोजन केले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर दोन्ही महापालिकांच्या स्थायी समिती अध्यक्ष सभागृहनेते तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पीएमपीएमएलची ही सेवा लगेच सुरु करायची की गणेशोत्सवानंतर सुरू करायची याबाबत जोरदार चर्चा झाली.

करोना बाधितांवर उपचार करण्यासाठी प्रस्तावित जंबो रुग्णालय सुरू होण्यासाठी आणखी काही अवधी जाणार आहे. पीएमपीएमएलची सेवा सुरू केल्यानंतर जर रुग्ण वाढले तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. त्यामुळे पीएमपीची सेवा ही ही गणेशोत्सवानंतरच सुरू करावी याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. त्यानुसार ही सेवा २५% क्षमतेने ३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीची सेवा सुरु करण्याला तत्वतः मान्यता दिली होती. त्यानुषंगाने पीएमपी प्रशासनाकडे निर्णय घेण्याचे अधिकार सोपवण्यात आले होते. पीएमपी सेवा अनलॉक होत असताना त्यादृष्टीने नियोजनही करण्यात येत आहे.

पीएमपीची प्रवासी संख्या १०-११ लाखांच्या घरात आहे. त्यामध्ये ३५ ते ४५ हजार पासधारक आहेत. सामान्य प्रवाशांसाठी पीएमपीची सेवा २५ मार्चपासून बंद करण्यात आली. सेवा बंद असल्याने पासधारकांचे पास विनावापर पडून आहेत. सेवा सुरू झाल्यावर संबंधितांच्या पासला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर पीएमपी प्रशासन सकारात्मक आहे. मात्र, पासला मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सेवेच्या पहिल्या दिवशी हे पास चालणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचाः

वााचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here