चंद्रिका राय यांच्यासहीत आमदार जयवर्धन यादव आणि फराज फातमी यांनी राजदला ठेंगा दाखवत जदयूचं सदस्यत्व स्वीकारलं. यानंतर मीडियाशी बोलताना लालू यांचे व्याही चंद्रिका राय यांनी आपल्या जुन्या पक्षावर जोरदार टीका केली.
महुआ मतदारसंघात?
‘लालू प्रसाद यादव यांचा मुलगा यांनी लोकसभा उमेदवाराच्या विरुद्ध काम केल्यानंतरही पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही’ असं म्हणताना चंद्रिका राय यांनी आपला जावई तेजप्रताप यादव यांच्या नावाचाही उल्लेख केला. याच दरम्यान चंद्रिका यांनी आपली मुलगी आणि तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय () या जदयूच्या तिकीटावर बिहारच्या महुआ मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं सूतोवाच केलं.
तेजप्रताप यादव महुआचे सद्य आमदार
चंद्रिका राय यांनी एका खासगी चॅनलशी बातचीत करताना, ‘तेजप्रताप यादव () आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दोघे भाऊ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? याची माहिती असेल तर आम्हालाही सांगा… असं ऐकलंय की दोघंही मतदारसंघ शोधत आहेत’ असं म्हणत शेलक्या शब्दांत टीका केलीय.
उल्लेखनीय म्हणजे, तेजप्रताप यादव सध्या वैशाली जिल्ह्यातल्या महुआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अशा वेळी चंद्रिका राय हे आपली मुलगी ऐश्वर्या राय यांनाच या मतदारसंघातून जदयूच्या तिकीटावर उमेदवारी मिळवून देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.
चंद्रिका राय यांचा राजकीय प्रवास
चंद्रिका राय यांचा राजकीय प्रवास १९८५ मध्ये सुरू झाला होता. वडील दारोगा राय यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या तिकीटावर ते १९८५ ची निवडणूक लढले आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९९० मध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षात प्रवेश केला. २००५ आणि २०१० साली चंद्रिका राय यांना जदयूच्या छोटेलाल राय यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु, २०१५ मध्ये चंद्रिका राय पुन्हा एकदा निवडून आले.
तेजप्रताप – ऐश्वर्या घटस्फोट प्रकरण
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद याव यांची सून आणि तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय यांना सासरच्या घरातून बाहेर पडावं लागल्याची बातमी आली होती. त्यावेळी ऐश्वर्या यांनी बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि सासू राबडी देवी तसंच ननंद मीसा भारती यांच्यावर छळाचा आरोप केला होता. याचा राग ऐश्वर्या यांचे पिता चंद्रिका राय यांच्या मनात आहे. तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाचं प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
Thanks so much for the blog post.
A big thank you for your article.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.