नवी दिल्लीः पूर्व लडाखमधील चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा ड्रॅगनच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC)आणि त्या पलिकडे असलेल्या चीनच्या हवाई दलाच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. चीन किमान ७ हवाई तळ भारतीय यंत्रणांच्या रडावर आहेत.

चीनचा शिनजियांग प्रांत आणि तिबेट क्षेत्रात असलेल्या PLAAF च्या होतान, गार गुंसा, काश्गर, होप्पिंग, कोंका जोंग, लिंजी आणि पंगट या हवाई तळांवर करडी नजर असल्याचं सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितलं.

चिनी हवाई दलाने अलिकडे काही हवाई तळांना अपग्रेड केलं आहे. त्यानुसार रनवेची लांबी वाढवणं आणि अतिरिक्त जवानांच्या तैनाती करण्यात आली आहे.

लिंजी तळ हा इशान्य भारतातील राज्यांच्या जवळ आहे. हा तळ हेलिकॉप्टरसाठी आहे. चिन्याने तळाच्या जवळ हेलिपॅड्सेचे नेटवर्कही तयार केलं आहे. याचा उपयोग त्या क्षेत्रांवर नजर ठेवण्यासाठी आणि आपल्या क्षमता वाढवण्यासाठी आहे.

चीनने लडाख सेक्टरसह सीमा भागात इतर ठिकाणीही लढाऊ विमानं तैनात केली आहेत. या विमानांमध्ये सुखोई-३० या लढाऊ विमानांच्या चिनी वर्जनचा समावेश आहे. यासोबत चीनच्या स्वदेशी जे-सिरीजच्या लढाऊ विमानांचाही समावेश आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्ष ताबा रेषेला लागून असलेल्या भागांमध्ये चीनच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून आहेत.

चीनशी मेपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने आपल्या आघाडीच्या तळांवर सुखोई-३० आणि मिग-२९ ही विमानं तैनात केली आहेत. यामुळेच तणावाच्या वेळी पूर्व लडाख सेक्टरमध्ये चिनी विमानांनी भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा हवाई दलाने चिनी विमानांना पिटाळून लावले होते.

लडाखमध्ये भारतीय हवाई दलाने चीनवर स्पष्टपणे आघाडी घेतली आहे. चिनी लढाऊ विमानांना अतिशय उंच अशा हवाई तळांवर उड्डाण घ्यावे लागत आहे. तर भारतीय लडाऊ विमानांचा ताफा मैदानी क्षेत्रातून उड्डाण घेताच लडाखमध्ये सहज पोहोचू शकतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here