नागपूर: प्रसूतीसाठी मेडिकलमध्ये ऑटोरिक्षाने आलेल्या महिलेची परिस्थिती पाहून डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी आपल्या उपकरणांसह धाव घेतली आणि या महिलेची ऑटोतच प्रसूती झाली. रविवारी दुपारी मेडिकलमध्ये हा प्रकार घडला. सध्या बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास भर उन्हात एका महिलेला ऑटोरिक्षाने प्रसूतीसाठी मेडिलमध्ये आणण्यात येत होते. मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वारातून ऑटोरिक्षा प्रवेश करताच बाजूलाच असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक केंद्रातील जवानाला ऑटोतील महिला प्रसूती वेदनांनी तडफडताना दिसली. त्यामुळे त्याने ऑटोजवळ जाऊन पाहिले. तिला शस्त्रक्रियागृहात नेऊन प्रसूती करण्यासारखीही परिस्थिती नव्हती.

Money News: एक निर्णय अन् झाला कोट्यधीश, सुट्ट्या पैशांनी चमत्कार घडवून आणला
त्यामुळे त्या जवानाने लगेच आकस्मिक कक्षात धाव घेतली आणि तेथील डॉक्टरांना हा प्रकार सांगितला. त्याबरोबर तेथील डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारीही धावतच ऑटोजवळ आले आणि त्यांनी तेथेच तिची प्रसूती केली. प्रसूती प्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी बाळाची प्रकृती तपासली व तो स्वस्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर आई व बाळाला प्रसती वॉर्डात दाखल करण्यात आले. या महिलेने मुलाला जन्म दिला असून, बाळ व बांळतीण सुखरूप असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

संबंधित सुरक्षा रक्षक, डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. जुल्फी अली, वर्षा बदकी, हेमा बोपचे, श्रद्धा धारगावे, परिचारिका अधीक्षक वैशाली तायडे यांनी या प्रक्रियेत पुढाकार घेतला.

रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिका पंक्चर; महिलेनं गाडीत दिला बाळाला जन्म

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here