मुंबई-सुशांत सिंग राजपूत प्रकरणात कालचा बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. आता सीबीआयची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मुंबईत पोहोचली आहे. टाइम्स नाऊच्या ताज्या अपडेटनुसार ही टीम सर्वातआधी मुंबई पोलिसांच्या दोन उपायुक्तांना प्रश्न विचारणार आहे.

दोन उच्च पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करेल
या रिपोर्टनुसार, सीबीआयचं पथक ज्या दोन लोकांविरूद्ध चौकशी करणार आहे त्यात दोन मोठ्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. आणि या दोघांची सीबीआय चौकशी करेल.

सुशांतच्या अपार्टमेंटमध्येही जाऊ शकते सीबीआय

याप्रकरणी सीबीआयची टीम सुशांतसिंह राजपूतच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये जाऊन पुन्हा चौकशी करू शकते. १४ जून रोजी याच घरात सुशांतचा मृतदेह आढळला होता.

सुशांतच्या व्हॉट्सअप चॅटबद्दल बोलले होते दहिया
याआधी दहिया यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं होतं की सुशांतचे मेहुणे आणि आयपीएस अधिकारी यांना लिखित स्वरुपात तक्रार नोंदवण्यात सांगितली होती. ओपी सिंह आणि दहिया यांचे सुशांतसंबंधी व्हॉट्सअप चॅटवर बोलणं झालं होतं. तेव्हा सिंह यांनी सुशांतच्या जीवाला धोका असल्याचं दहिया यांना सांगितलं होतं.

ओपी सिंह यांनी फेब्रुवारीमध्ये पाठवलेला निरोप

टाइम्स नाऊशी बोलताना दहिया यांनी सांगितलं होतं की ओपी सिंह यांनी १९ आणि २५ फेब्रुवारी रोजी सुशांतसंदर्बातला मेसेज पाठवला होता. ते पुढे म्हणाले की, ‘सिंह यांना फोनवर स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, त्यांनी लेखी तक्रार करणं बंधनकारक आहे. तरच यावर कार्यवाई होऊ शकते.’ दहिया म्हणाले की, ओपी सिंह यांना अनधिकृतपणे प्रकरण सोडवायचे होते. तसेच आरोपी मुलीला अनधिकृतपणे पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना प्रकरण थांबवायचं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here