मुंबईः सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला भाजपने पुन्हा एकदा घेरलं आहे. राज्य सरकारमुळं मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, अशी टीकाही भाजपच्या नेत्यानी केली आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी यावरुन पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारणही तापले आहे. सुशांतच्या आत्महत्येचा संबंध महाविकास आघाडीतील नेत्यांशी जोडल्यानंतर भाजपही आक्रमक झाली होती. त्यानंतर भाजप नेते यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. आता पुढचे दिवस सामना अग्रलेखाचे विषय पुढील प्रमाणे असतील. मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणूस असं ट्विट त्यांनी केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी नाइट लाइफवरही भाष्य केलं आहे. नाइट लाइफ करताना यांना मराठी माणूस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही. तेव्हा दिनो मोरिया, जॅकलीन आणि दिशा पाहिजे असतात. वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस दिसतो, असा उपरोधित टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर भाजप नेत्यानं न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं तर राज्य सरकारवर टीका सुरू केली होती. नितेश राणे यांनी फक्त काही शब्दांचे ट्वीट केलं होतं. तर अब बेबी पेंग्विन तो गियो… इट्स शो टाइम असं ही त्यांनी म्हटलं होतं.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सावध प्रतिक्रिया देणाऱ्या शिवसेनेनं ‘सामना’तून सविस्तर भूमिका मांडली आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

>> देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय व कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी व हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये.
>>सुशांत प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे व्हायला हवाच. त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात काही शंका असतील तर त्यावर प्रकाश पडायलाच हवा, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

>> मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा शंभर नंबरीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. मुंबई पोलिसांचा तपास कायद्याच्या चौकटीत योग्य दिशेनेच सुरू होता, पण एखाद्या गोष्टीचे राजकीय भांडवल करायचेच म्हटल्यावर दुसरे काय होणार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here