मुंबई: क्रौर्याची परिसीमा ओलांडण्यात आलेल्या मिरारोड येथील हत्याप्रकरणाचा तपास हा दिवसागणिक पुढे सरकत आहे. मिरारोडच्या गीतानगर परिसरात राहणाऱ्या मनोज साने याने त्याची पत्नी सरस्वती वैद्य हिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. ही एकूण घटना अंगावर शहारे आणणारी असल्याने त्याची बरीच चर्चा झाली. मात्र, मनोजने आपण सरस्वतीची हत्या केली नाही, तिनेच विषप्राशन करुन आत्महत्या केली, असा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांसमोर पेच उभा राहिला होता. मनोज याने सरस्वतीच्या मृतदेहाचे बारीक तुकडे केल्याने फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही सरस्वतीच्या शरीरात विषाचा अंश आहे की नाही, हे तपासणे जवळपास अशक्यप्राय होऊन बसले होते. मात्र, मनोज सानेच्या चौकशीदरम्यान एक महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हात लागली आहे. त्यानुसार मनोज साने यानेच सरस्वतीला कीटकनाशक पाजल्याचा अंदाज आहे. आता त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांना मनोजच्या फ्लॅटमध्ये सरस्वती वैद्य हिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले होते. सुरुवातीला मनोज आपण मृतदेहाचा कोणताही भाग घराबाहेर नेला नसल्याचा दावा करत होता. परंतु, चौकशीदरम्यान मनोज याने सरस्वतीच्या मृतदेहाचे काही तुकडे रेल्वेमार्गालगत असलेल्या नाल्यात टाकल्याचा संशय आहे. तसेच सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा मनोजचा दावा आहे. मात्र, सरस्वतीने प्यायलेले कीटकनाशक मनोजनेच खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी मनोजला बोरिवलीच्या बाभई परिसरातील एका नर्सरीत नेले होते. मनोजने येथून कीटकनाशक खरेदी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मनोज साने आणि सरस्वती यांच्या मोबाइलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत.

Mira Road Murder: कोट्यधीश आहे सरस्वतीला मारुन तिचे तुकडे शिजवणारा मनोज साने, पाहा संपत्ती किती?

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात मनोज-सरस्वतीचं लग्न

मनोज साने याने सरस्वतीसोबत लग्न झाल्याची बाब लपवली होती. ती आपली लिव्ह इन पार्टनर असल्याचे मनोज सांगत होता. मात्र, या दोघांनी २०१४ मध्ये वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सरस्वती वैद्य हिच्यावर सोमवारी रे रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्या बहि‍णींनी जे.जे. रुग्णालयातून ताब्यात घेतले आणि त्यावर अंत्यसंस्कार केले.

Mira Road Murder: मनोज साने थिअरीवर अडून बसला, तज्ज्ञ म्हणतात आता पोलिसांसमोर दोनच पर्याय उरलेत

याशिवाय, गीता आकाशदीप इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनोज साने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी बाहेर जात असल्याचे दिसून आले आहे. सरस्वतीच्या शरीराचे अवयव एका पिशवीत घेऊन जाताना दिसत आहे. त्याचबरोबर आरोपी मनोज साने हा मृत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here