मुंबई: अध्यक्ष यांची गुप्त भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. सध्या तरी मनसे आणि भाजपची युती नाही. दोघांच्या विचारांत अंतर आहे. मनसेची कार्यपद्धती बदलली आणि दोन्ही पक्षांची मनं जुळली तर युती होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मनसे आणि एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं होतं. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत तर भाजपच्या बॅनर्सवर राज ठाकरे यांचे फोटोही झळकले होते. नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपने युती केली होती. मनसे आणि भाजची एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची प्रभादेवी येथील एका हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली होती. यावेळी राज आणि फडणवीस यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आणि त्यांचे सहकारीही नव्हते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे संकेत दिले.

राज यांच्यासोबत अनेक भेटी झाल्या आहेत. पण दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे आज तरी चिन्हं दिसत नाही. दोन्ही पक्षांच्या विचारात अंतर आहे. मनसेची कार्यपद्धती बदलली तर त्यांच्याशी युती करण्याचा विचार होऊ शकतो. पण सध्या तरी भाजप मनसेसोबत नाही, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, येत्या २३ जानेवारी रोजी मनसेचं मुंबईत महाअधिवेशन होत आहे. यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं लाँन्चिंग होणार आहे. राज यांनी २३ जानेवारी रोजीच राजकीय भाष्य करणार असल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मनसेच्या महाअधिवेशनात राज काय बोलतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. फडणवीस यांच्या भेटीबाबतही राज भाष्य करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here