नवी दिल्ली: सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या एसआयटीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे सीबीआयच्या टीमला शोधावी लागणार आहेत. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुशांतसिंग राजपूतचा खून झाला का?, हा आहे. याच प्रश्नाचे उत्तर प्रथम देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयला द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे आज मुख्यालयात झालेल्या बैठकीत या प्रश्नाकडे लक्ष देण्यात आले.

या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयला प्रथम याचा खून झाला का हे शोधावे लागेल. हत्येशी संबंधित काही तथ्ये आढळतात का याचा तपास करताना सीबीआय घटनास्थळाची कसून तपासणी करणार आहे. त्याच प्रमाणे गुन्ह्याचा तपास, शवविच्छेदनाचा अहवाल आणि फॉरेन्सिक तपास केला जाईल. या सोबतच सीबीआयला मुंबई पोलिसांकडूनही काही तपशील मिळवावा लागणार आहे. त्याच प्रमाणे सीबीआय टीमला तांत्रिक, फॉरेन्सिक आणि टीएफसीची मदत घ्यावी लागेल. तसेच सुशांतसिंह याच्या घरी पुन्हा तो क्राइम सीन क्रिएट करावा लागणार आहे. या बैठकीत सहभागी झालेले सीबीआयच्या एसआयटीचे अधिकारी आजच रात्री मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे सीबीआय या प्रकरणाचा तपास करताना बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे करण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन कार्यवाही सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायालयात होईल. याचाच अर्थ सीबीआयने एखाद्याला अटक केल्यास प्रथम त्या व्यक्तीला ट्रान्झिट रिमांडसाठी मुंबईतील न्यायालयात हजर व्हावे लागेल.

बिहार पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आत्महत्येसाठी उद्युक्त करणे, फसवणूक करणे आणि कट रचणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये कलम ३४१, ३४८, ३८०, ४०६, ४२०, ३०६ आणि १२० ब या कलमांचा समावेश आहे.

वाचा-
सीबीआयची टीम सुशांतसिंहच्या मुंबईतील घराला भेट देण्याची शक्यता आहे. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या भेटीत या प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का यासाठी सीबीआय कसून तपासणी करेल यात शंका नाही.

वाचा-
सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबाने सुशांतचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सीबीआयची एसआयटी हाच संशय गृहित धरून सुशांतच्या फ्लॅटमधील खोलीत क्राइम सीन क्रिएट करेल. या सोबतच डमी टेस्ट देखील होण्याची शक्यता आहे.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here