परभणी : परभणीतील एका गावात दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या महिलांच्या लढ्याला यश आले आहे. परभणी तालुक्यातील साळापूरी ग्रामपंचायतीने एकमताने दारुबंदीचा ठराव मंजूर केला आहे. महिलांच्या लढ्यामुळे गावात बाटली आडवी झाली आहे. सोमवार १२ जून रोजी हा ठराव घेण्यात आला. त्यामुळे आता इथून पुढे गावामध्ये दारूची विक्री होणार नसल्याचे यावेळी महिलांना सांगण्यात आले आहे.
सीईटीसाठी अंतिम वेळी भरला अर्ज, पठ्ठ्याने थेट राज्यात पहिलं येऊन गाजवलं मैदान

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी तालुक्यातील साळापुरी येथे अवैधरित्या दारु विक्री होत होती. या दारुमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. अवैध दारू विक्रीमुळे गावातील लहान मुलांना देखील दारूचे व्यसन लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. यासोबतच दारू पिऊन पती महिलांना मारहाण करण्याच्या घटना देखील वाढल्या होत्या. याला कंटाळलेल्या महिलांनी रस्त्यावर उतरून दारु विरोधात आंदोलन केले. ग्रामपंचायतीकडे दारुबंदी ठराव घेण्याविषयी आग्रह केला. अखेर महिलांच्या मागणीला यश आले आहे.

बाप शेतकरी आई मोलमजुरी करणारी, लेकानं मात्र नाव काढलं; इंडियन आर्मी इंजीनियरिंग फोर्समध्ये बाजी

सरपंच मिरा घाटगे, उपसरपंच सखुबाई घाटगे, ग्रामसेवक ए. आर. कावरके, ग्रा.पं. सदस्य संगीता रणखांबे, सविता धनुरे, शिलाताई घाटगे, बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने दारुबंदीचा ठराव घेण्यात आला. ग्रामपंचायतने गावामध्ये अवैध दारू विक्री न करण्याचा ठराव घेतल्याने यापुढे साळापूरी गावात अवैध दारू विक्री होणार नाही. यामुळे गावातील महिलांना होणारा त्रास कमी होणार आहे. यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीने गावात अवैध दारू विक्री न करण्याचा ठराव घेतल्याने गावातील तळीरामांची चांगलीच अडचण निर्माण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here