वाचा-
दिग्गज टेक कंपनी अॅपलने बुधवारी ऐतिहासिक असा २ ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला. अॅपलचे जवळपास १५० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. अशी कामगिरी करणारी ही अमेरिकेतील पहिली कंपनी आहे. अॅपलच्या या कामगिरीकडे पाहिले तर असा प्रश्न पडतो की भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला हा टप्पा गाठण्यासाठी किती काळ लागले.
वाचा-
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंटस्ट्रीज लिमिटेडला सारखी कामगिरी करायची असेल तर ते अद्याप फार दूर आहेत. त्यासाठी अंबानी यांना प्रचंड मेहनत करावी लागेल. अॅपलचे मार्केट कॅप १५० लाख कोटी झाले आहे. तर अंबानी यांच्या रिलायन्सचे मार्केट कॅप १३ ते १४ लाख कोटींच्या आसपास घुटमळत आहे.
वाचा-
आजच्या घडीला रिलायन्सचे बाजार भांडवल १३.५ लाख कोटी इतके आहे. याचा अर्थ रिलायन्सचे बाजार भांडवल हे अॅपलच्या बाजार भांडवलाच्या फक्त १० भाग आहे. जर अॅपलची किमत १ रुपया असेल तर त्याच्या समोर रिलायन्स १० पैसे देखील नाही. यामुळेच अॅपलला टक्कर देण्यासाठी अंबानी यांना आणखी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.
वाचा-
नॅसडॅकमध्ये बुधवारी सकाळी बाजार सुरू होताच अॅपलचे शेअर ४६७.७७ डॉलरवर पोहोचले त्याचबरोबर कंपनचे मार्केट कॅप २ ट्रिलियनवर गेले. आयफोन, आयपॅड निर्मिती करणाऱ्या ही कंपनी १२ डिसेंबर १९८० रोजी पब्लिक लिस्टेड झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर ७६ हजार टक्क्यांनी वाढलेत. दोन वर्षापूर्वी अॅपलने १ ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपचा टप्पा गाठला होता. अॅपलची स्थापना स्टीव जॉब्स यांनी १९७६ साली पर्सनल कम्प्युटर्स विक्रीसाठी केली होती. आता या कंपनीने २ ट्रिलियन डॉलरचे मार्केट कॅप गाठले आहे. ही रक्कम अमेरिकेत गेल्या वर्षी जमा झालेल्या एकूण कर उत्पन्नापेक्षा थोडी अधिक आहे.
वाचा-
ऑगस्ट २०१९ पर्यंत रिलायन्सचे मार्केट कॅप ८.६ लाख कोटी इतके होते. आता ऑगस्ट २०२० मध्ये ते १३.५ कोटी इतके झाले आहे. याचा अर्थ त्यांचे मार्केट कॅप ६० टक्क्यांच्या दराने वाढले. जर कंपनी याच वेगाने वाढली तर १५० लाख कोटीवर पोहोचण्यासाठी १० वर्ष लागतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Thank you for publishing this awesome article.