न्यूयॉर्क: अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला ३.७५ लाख डॉलर म्हणजेच ३ कोटी रुपयांहून अधिकची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वी कधीही लॉटरीचे तिकीट घेतले नव्हते. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि तब्बल ३ कोटी रुपये जिंकले. लॉटरी जिंकल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितले की हा एक चांगला अनुभव आहे.

पुन्हा कधी लॉटरी तिकीट विकत घेईन की नाही माहीत नाही

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लॉटरीत एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतरही पुन्हा कधी लॉटरीचं तिकीट खरेदी करेल की नाही हे माहीत नसल्याचं त्या व्यक्तीने सांगितले. तो म्हणाला, ‘माझे सर्व लक्ष जिंकलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यावर आहे. मी पुन्हा कधी लॉटरीचे तिकीट विकत घेईन की नाही हे मला माहीत नाही.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण
बक्षीस जिंकल्यापासून अद्यापतरी त्याने लॉटरीचे कोणतेही तिकीट खरेदी केलेले नाही. अहवालानुसार, या व्यक्तीने १० डॉलर्समध्ये माईटी जंबो डक्स स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी केले, ज्यावर त्याला ३ कोटींची लॉटरी लागली.

डिझेल भरायला पैसे नव्हते, रुग्णवाहिका तब्बल एक तास पंपावर अडकली; गर्भवती महिलेला वेदना असह्य

सुट्या पैशातून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं अन् कोट्यधीश झाला

याआधीही साऊथ कॅरोलिनातील एका व्यक्तीने सुट्या पैशांतून घेतलेल्या लॉटरीतून २.५ कोटी रुपये जिंकले होते. ही व्यक्ती काही वस्तू घेण्यासाठी एका दुकानात गेला, तिथे त्याला १० डॉलर सुट्टे देण्यात आले. या पैशातून त्याने लॉटरीची काही तिकीटं विकत घेतली. जेव्हा या लॉटरीचा निकाल आल्यावर तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने ३ लाख डॉलरची म्हणजे सुमारे २.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती.

Mira Road Murder: कोट्यधीश आहे सरस्वतीला मारुन तिचे तुकडे शिजवणारा मनोज साने, पाहा संपत्ती किती?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here