नवी दिल्ली: सुरतचे प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांची पूर्ण काळजी घेतात आणि यासाठीच ते प्रख्यातही आहेत. मुख्यत्त्वे सावजी ढोलकिया हे आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी कर्मचार्‍यांना कार, फ्लॅट, महागडे दागिने तसेच करोडो रुपयांची एफडी भेट दिली आहे. सावजी ढोलकिया यांनी दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना बंपर भेटवस्तू दिल्या. सावजी ढोलकिया २०१५ मध्ये कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तूंमुळे चर्चेत आले होते. सुरतच्या या हिरे व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू दिल्या आहेत हे पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

२०१५ पासून चर्चेत

खरे तर २०११ पासून सावजी ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त महागड्या भेटवस्तू देत आहेत. पण २०१५ मध्ये सर्वाधिक चर्चेत आले. यंदाच्या दिवाळीनिमित्त त्यांनी आपल्या १२०० कर्मचाऱ्यांना दागिने, २०० फ्लॅट आणि ४९१ कार भेट दिल्या. यापूर्वी २०१४ मध्येही त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० कोटी रुपयांचे वाटप केले होते.
शेअर बाजारातील सर्वात स्पेशल स्टॉक; २२ वर्षात अनेकांना लखपती केलं पण एकदाही…
२०१८ मध्ये भेट म्हणून कार

हरी कृष्णा एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष सावजी ढोलकिया यांनी २०१८ च्या दिवाळीत ६०० कर्मचाऱ्यांना कार आणि ९०० कर्मचाऱ्यांना एफडी दिली होती. त्यांनी आपल्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेंझसारख्या महागड्या कार भेट दिल्या होत्या. या कर्मचाऱ्यांनी कंपनीत २५ वर्षे सेवा पूर्ण केली होती. ढोलकिया यांची कंपनी ५० देशांमध्ये हिऱ्यांची निर्यात करते.

मिस्त्रीचं काम सोडलं, पठ्ठ्याला जडला शेतीचा छंद; २ एकर पपईतून कमावलं लाखोंचं उत्पन्न

कर्ज घेऊन व्यवसाय सुरू

सावजी ढोलकिया यांनी काकांकडून कर्ज घेऊन हिऱ्यांचा व्यवसाय सुरू केला. ढोलकिया यांनी डायमंड पॉलिशिंगमध्ये १० वर्षांच्या मेहनतीनंतर १९९१ मध्ये हरी कृष्णा एक्सपोर्ट्सची स्थापना केली. त्यावेळी कंपनीची विक्री केवळ नावालाच होती. मार्च २०१४ पर्यंत कंपनीची उलाढाल ४ अब्ज रुपयांवर पोहोचली होती. सध्या त्यांच्या कंपनीत हजारो कर्मचारी काम करतात. सावजी ढोलकिया यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते हिऱ्यांचे दागिने परदेशातही निर्यात करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here