म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत येत असल्याचे स्पष्टीकरण देत आमचे विलगीकरण करू नका, अशी विनंती अधिकार्‍यांनी मुंबई महापालिकेला केली आहे. त्यांचे विलगीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपावल्यानंतर आज सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली आहे. याआधी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासासाठी बिहार पोलिस मुंबईत दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यावरुन राजकारणही तापलं होतं. या पार्श्वभूमीवर सीबीआय टीमलाही क्वारंटाइन करणार का असा प्रश्न पालिकेला विचारण्यात येत होता. यावर अखेर पालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दिल्लीतील सीबीआयचे पथक मुंबईत येऊन याचा तपास करणार आहेत. मात्र दिल्लीतून सीबीआयचे किती अधिकारी, किती दिवसांसाठी मुंबईत येणार आहेत, याची माहिती पालिकेकडे नाही. ते पोलिसांचे काम आहे. सीबीआय अधिकार्यांच्या मागणीवर विलगीकरण न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती वेलरासू यांनी दिली आहे.

वाचाः

दरम्यान, महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं क्वारंटाइनबाबत गाइडलाइन्स निश्चित केल्या आहेत. या गाइडलाइन्स पाळण्याचे सर्वांनाच बंधनकारक आहे, असं स्पष्ट केलं होतं. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक फक्त सात दिवसांसाठीच मुंबईत येणार असेल व त्यांच्याकडे परतीचं कन्फर्म तिकीट असेल तर पालिकेच्या गाइडलाइन्सनुसार त्यांना क्वारंटाइनमधून आपोआपच सूट मिळेल. त्यांना सातपेक्षा अधिक दिवस येथे राहायचं असल्यास क्वारंटाइनमधून सूट मिळण्याबाबत त्यांना आमच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवावा लागेल. म्हणजे आम्ही त्यांना तशी सवलत देऊ, असेही चहल यांनी स्पष्ट केले होतं.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here