पुणेः शहर व जिल्ह्यात मृत्यूसंख्येप्रमाणे आता रुग्णसंख्याही वाढली आहे. गुरुवारी ३५४४ जणांना संसर्ग झाला असून जिल्ह्यात ७१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होत असताना त्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्ण आणि मृत्यूची संख्या चिंताजनक स्थिती पुन्हा निर्माण होत असल्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही गुरुवारी पाचशेच्या पुढे गेली आहे.

पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसत आहे. त्यामुळे गांभिर्य वाढत आहे. दुसरीकडे काही दिवसांपासून मृत्युमुखींची संख्याही दोन्ही शहरात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहर व जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या आता सहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असल्याने त्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे चित्र आहे.

पुणे शहरात गुरुवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली. १६६९ जणांना लागण झाली असून आता ७९ हजारापर्यंत रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर गंभीर रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊन ८०२ रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून ४८६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ३१६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. तसेच २४८५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. एका दिवसात १३८६ रुग्ण डिस्चार्ज झाले असून आतापर्यंत ६२ हजार ३४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

वाचाः

राज्यात आज तब्बल १२ हजार २४३ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. तर, राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३७ टक्के इतका झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३२६ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २१ हजार ३५९ इतकी झाली आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here